शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांच्या तक्रारी निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:56 IST

वीज ग्राहकांच्या तक्रारींच्या सोडवणूक करता यावी यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या गोंदिया परिमंडळाकडून सडक-अर्जुनी येथे ....

अधिकाऱ्यांनी ऐकल्या तक्रारी : महावितरणचे तक्रार निवारण शिबिर लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वीज ग्राहकांच्या तक्रारींच्या सोडवणूक करता यावी यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या गोंदिया परिमंडळाकडून सडक-अर्जुनी येथे महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात ग्राहक तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महावितरणचे गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता जे.एम. पारधी व गोंदिया प्रविभागाचे अधीक्षक अभियंता एल.एम. बोरीकर यांच्या मार्गदर्शनात देवरी विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एम.वाकडे व सडक-अर्जुनी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता नादेव एस. शेख यांच्यातर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते व यात अधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेत त्यांना निकाली काढल्या. या ग्राहक तक्रार निवारण शिबिरामध्ये नगराध्यक्ष रिता लांजेवार, जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर, जि.प. सदस्य रमेश चुरे, पं.स.सभापती डॉ. काशिवार, सुधीर विनायक शिवणकर, सरपंच शिवाजी गहाणे, नाजुकराम झिंगरे, अरुण लेदे, प्रल्हाद वरठे, बुधराम लंजे, जगन लंजे, जगदीश उपरीकर व इतर वीज ग्राहक तसेच महावितरणचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.ग्राहकांनी या शिबिरामध्ये सडक-अर्जुनी तालुक्यातील कमी दाबाचा विज पुरवठा, नादुरुस्त मिटर, महावितरण आपल्या दारी योजनेंतर्गत देण्यात आलेल्या विज जोडणीचे लघुदाब वाहिनीची प्रलंबित कामे, अतिभारीत रोहित्रे इत्यादी तक्रारी मांडल्या. या तक्रारींबाबत अधीक्षक अभियंता बोरीकर यांनी सडक-अर्जुनी तालुक्यात महावितरणतर्फे प्रस्तावीत उपकेंद्रे, रोहित्रे व लघुदाब, उच्चदाब वाहिनी इत्यादी कामांची माहिती दिली व कमी दाबाच्या तक्रारीचे लवकरच निराकरण करण्याचे आश्वासन दिले. शिबिरामध्ये कार्यकारी अभियंता वाकडे यांनी, कृषीपंपासाठी शासनाद्वारे जाहिर केलेल्या सौर पंपाच्या योजना तसेच ग्राहकांसाठी महावितरणतर्फे देण्यात येणाऱ्या मोबाईल अ‍ॅप बाबत माहिती दिली. तसेच ग्राहकांनी मोबाईल अ‍ॅपचा जास्तीत-जास्त वापर करुन महावितरणाच्या विविध सेवांचा उपयोग करण्यासाठी आवाहन केले. शिबिरामध्ये उपस्थित झालेल्या काही तक्रारींचे निवारण लगेच करण्यात आले व काही तक्रारींचे निवारण लवकरच करण्यासाठी बोरीकर यांनी सडक-अर्जुनीचे उपकार्यकारी अभियंत्यांना निर्देश दिले.महावितरणतर्फे तालुकास्तरावर ग्राहक तक्रार निवारण शिबिराचे आयोजन प्रत्येक तालुक्यात करण्यात येणार आहे. या शिबिरातून ग्राहकांच्या तक्रारी ऐकून त्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे शिबिराचा जास्तीत-जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणर्फे जिल्ह्यातील वीज ग्राहकांना करण्यात आले आहे.