शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

येरंडी-देव मामा तलावातील शेतजमिनीचे अतिक्रमण हटवा

By admin | Updated: March 6, 2015 01:44 IST

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील येरंडी-देव येथील माजी मालगुजार तलावातील शेतजमिनीचे अतिक्रमण विनाविलंब हटविण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थ तथा वनअधिकार समिती...

बोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील येरंडी-देव येथील माजी मालगुजार तलावातील शेतजमिनीचे अतिक्रमण विनाविलंब हटविण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थ तथा वनअधिकार समिती येरंडीच्या वतीने सबंधितांना करण्यात आली आहे. मामा तलावामध्ये शेतजमीन काढून अतिक्रमण करणाऱ्या दहा शेतकऱ्यांचे अतिक्रमण काढण्यात यावे, असा ठराव ग्रामसभेत बहुमताने नोव्हेंबर २०१४ मध्ये पारित करण्यात आला. परंतु ठरावाची अंमलबजावणी न होता, त्या ठरावाला केराची टोपली दाखविण्यातच सबंधितांनी धन्यता मानली. त्वरित अतिक्रमण हटविण्यात आले नाही तर ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गावातील शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे. येरंडी-देव येथील ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गावामध्ये १९६२ ते ६५ च्या दरम्यान मामा तलावाची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी तलावाची आराजी ३२ ते ३३ एकर होती. सदर तलावावर वेळोवेळी शासनाच्या वतीने माती काम करण्यात आले. पर्यायाने तलावाच्या पाळीची लांबी व रूंदी वाढत गेल्याने तलावातील आतील भाग विस्तीर्ण झाले. गावातील दहा लोकांनी तलावाच्या पोटामध्ये शेतजमीन काढून अतिक्रमण केले. गावातील मोजक्या लोकांनी काढलेल्या अतिक्रमण शेतजमिनीमुळे तलाव पाण्याने तुडूंब भरले. यानंतर अतिक्रमण धारकांच्या पिकांमध्ये पाणी शिरून धानाचे नुकसान होत असल्याचे दिसताच अतिक्रमणधारक शेतकरी स्वत:च्या मर्जीने वेळी-अवेळी तलावाचे गेट उघडून पाणी सोडतात. त्यामुळे मालकी हक्काच्या शेतकऱ्यांना पाण्याअभावी धान उत्पादनापासून वंचित रहावे लागते. तलावामध्ये अतिक्रमण करून शेतजमीन काढणाऱ्यांचे विनाविलंब अतिक्रमण काढण्यात यावे. यासाठी ग्रामस्थांच्या वतीने संबंधित अधिकारी तसेच येरंडी-विहीरगाव गट ग्रामपंचायतला निवेदन देण्यात आले. ग्रामस्थांच्या निवेदनाची दखल घेऊन ग्रामपंचायतच्या वतीने १९ नोव्हेंबर २०१४ रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. येरंडी (देवी) येथील सार्वजनिक चौकातील हनुमान मंदिर परिसरात झालेल्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी हेमंत बारसे होते. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तलावातील अतिक्रमण काढण्यात यावा या एकमेव मुद्यावर चर्चा करण्यात आली. विषयाच्या अनुषंगाने एकमत न झाल्याने मतदानाने निर्णय घेण्यात आला.अंमलबजावणी न झाल्यामुळे मालकी हक्काच्या जमीन धारकांत पाणी कुठे तरी मुरत आहे, असा सशंय निर्माण होत आहे. संबंधितांनी ठरावाची अंमलबजावणी केली नसल्याने त्या ग्रामसभेच्या ठरावाला अधिकारी वर्गाकडून केराची टोपली मिळाली असावी, असा सूर ग्रामस्थांमध्ये आहे. मामा तलावातील अतिक्रमण करून शेतजमीन करणाऱ्यांचे अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे अन्यथा ग्रामस्थ तसेच वन अधिकार समिती येरंडी-देवच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. (वार्ताहर)