शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

८४७ शेतकऱ्यांना दिलासा

By admin | Updated: May 25, 2016 01:58 IST

गेल्यावर्षी दुष्काळाची झळ सोसलेल्या १०९ गावांतील शेतकऱ्यांना शासनाच्या पीक कर्ज पुनर्गठन योजनेमुळे दिलासा मिळाला आहे.

कर्जाचे पुनर्गठन : २.८५ कोटींचे कृषीकर्ज भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढकपिल केकत गोंदियागेल्यावर्षी दुष्काळाची झळ सोसलेल्या १०९ गावांतील शेतकऱ्यांना शासनाच्या पीक कर्ज पुनर्गठन योजनेमुळे दिलासा मिळाला आहे. यात जिल्हा मध्यवर्ती बँकेंतर्गत जिल्ह्यातील ८४७ शेतकरी पात्र ठरले असून त्यांच्या दोन कोटी ८५ लाख ६५ हजार रूपयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले आहे. शासनाचा हा निर्णय त्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरला असून त्यांना खरिपाचे नियोजन करण्यास मदत होणा आहे. मात्र या योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त असून त्यांना जुने कर्जच फेडता न आल्याने नवीन कर्ज कसे मिळवायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.‘पोट दिले आहे, तर पोळीही तोच देणार’ ही म्हण आहे. त्यानुसार सर्वांना दोन वेळच्या भाकरीची व्यवस्था होते. मात्र रक्ताचे पाणी करून अवघ्या जगाचे पोट भरणाऱ्या शेतकऱ्यावरच उपाशी मरण्याची पाळी आली आहे. दुष्काळ व नापिकीच्या झळांनी होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे होते. उशिरा का होईना, राज्य सरकारने १०९ गावे दुष्काळी गावे म्हणून जाहीर केली. वास्तविक बिकट परिस्थिती असणारी त्यापेक्षाही जास्त गावे जिल्ह्यात आहेत. पण शासन दरबारी नोंद झालेल्या त्या १०९ गावांमधील शेतकऱ्यांनाच दुष्काळी परिस्थितीचा फायदा घेता येणार आहे.दुष्काळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्याने खचून गेलेल्या शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दारी पोहोचण्यापूर्वी शासनाने शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची पुनर्गठन करून कर्जवसुलीच्या तगाद्यातून त्यांची सुटका केली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त भागातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्ज परतफेडीसाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली असून कर्जावरील व्याज दरातही सवलत दिली जाणार आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या मागे कर्ज परतफेडीसाठी तगादा लावला जाणार नाही. या पुनर्गठन योजनेंतर्गत जिल्ह्यातील १०९ गावांतील ८४७ शेतकरी पुनर्गठनासाठी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांचे दोन कोटी ८५ लाख ६५ हजार रूपयांचे पिक कर्ज पुनर्गठीत करण्यात आले आहे. आता खरिप हंगामाला सुरूवात झाली आहे. अगोदरचे कर्ज अंगावर असताना शेतकऱ्यांना खरिपाची तयारी करणे अवघड होते. मात्र पुनर्गठनाने त्यांच्यावरील कर्जाचे ओझे काही प्रमाणात कमी करण्यात दिलासा मिळाला आहे. दुष्काळी भागात सात कोटींची परतफेड५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या १०९ गावातील दोन हजार ९९० शेतकऱ्यांना खरिप हंगाम २०१५ अंतर्गत नऊ कोटी ८९ लाख ३७ हजार रूपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले होते. त्यातील दोन हजार १४३ शेतकऱ्यांनी सात कोटी ३ लाख ७२ हजार रूपयांचा भरणा केला. परिणामी उरलेले ८४७ शेतकरी पुनर्गठनासाठी पात्र ठरले. बँकांच्या तगाद्यातून सुटकाकर्जधारक शेतकऱ्यांना त्यांच्याकडील कर्जाची परतफेड करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत असते. त्यानंतर उरलेल्या कर्जावर व्याजदर वाढविण्यात येतो. मात्र पिक कर्ज पुनर्गठन योजनेंतर्गत दुष्काळग्रस्त भागातील पात्र शेतकऱ्यांना दिलासा देत कर्ज परतफेड करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या उर्वरीत कर्ज रकमेवर व्याज लावण्यात येणार नाही. शिवाय कर्जवसुलीसाठी बँकांकडून तगादा लावला जाणार नाही.