शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रुग्णालयांना दिलेले रेमडेसिविर इंजेक्शन मिळाले परत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 05:00 IST

अतिरिक्त पैसे मोजून देखील अनेकांना वेळेवर रेमडेसिविर इंजेक्शन न मिळाल्याने काही रुग्णांचा जीवसुद्धा गेला होता. खासगी रुग्णालयांना सुद्धा रेमडेसिविर इंजेक्शन मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे शासनाने जिल्हाधिकारी कार्यालय आणि शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून त्याचे खासगी रुग्णालयांना वितरण करण्यात आले होते. त्यामुळे रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. अतिरिक्त पैसे मोजून देखील अनेकांना वेळेवर रेमडेसिविर इंजेक्शन न मिळाल्याने काही रुग्णांचा जीवसुद्धा गेला होता. खासगी रुग्णालयांना सुद्धा रेमडेसिविर इंजेक्शन मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे शासनाने जिल्हाधिकारी कार्यालय आणि शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून त्याचे खासगी रुग्णालयांना वितरण करण्यात आले होते. त्यामुळे रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य झाले होते. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर सर्वाधिक खासगी रुग्णालयात झाला होता. या इंजेक्शनचे खासगी रुग्णालयांना वाटप केल्यानंतर त्यांनी किती इंजेक्शनचा वापर केला आणि किती इंजेक्शन शिल्लक राहिले याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देऊन उर्वरित इंजेक्शन परत करायचे होते. एक दोन मोजकी खासगी रुग्णालये वगळता सर्वांनीच ते परत केले. 

तिसऱ्या लाटेसाठी नियोजन कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविला जात असून त्या दृष्टीने ऑक्सिजन, आयसीयू बेड, रेमडेसिविर इंजेक्शन, कोविड केअर सेंटर, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. तसेच त्या दृष्टीने जिल्हा आरोग्य विभागाची यंत्रणादेखील कामाला लागली आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. मात्र, नागरिकांना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. 

...तर होणार कारवाई रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये यासाठी त्याचे वितरण योग्य पद्धतीने केले.खासगी रुग्णालयांना दिलेल्या इंजेक्शनचा किती वापर केला, किती इंजेक्शन शिल्लक राहिले. शिल्लक राहिलेले इंजेक्शन त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला परत केले.ज्या ते परत केले नाही त्यांना कारवाईची नोटीस बजाविण्यात येणार होती. मात्र, जिल्ह्यातील सर्वच खासगी रुग्णालयांनी ते वेळेत परत केले त्यामुळे कारवाईची वेळ आली नाही.  

टॅग्स :remdesivirरेमडेसिवीरCorona vaccineकोरोनाची लस