शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांची तुरुंगात रवानगी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:29 IST

गोंदिया : कोविड रुग्णांना जीवनदान देणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्याबाजारात विक्री करण्यात येत होती. हे रेमडेसिविर इंजेक्शन चक्क गोंदियाच्या केटीएस ...

गोंदिया : कोविड रुग्णांना जीवनदान देणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्याबाजारात विक्री करण्यात येत होती. हे रेमडेसिविर इंजेक्शन चक्क गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातून काळ्याबाजारात विक्रीसाठी जात होते. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना अटक केली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी संजू विकास बागडे, दर्पण नागेश वानखेडे, नीतेश ऊर्फ करण भीमराव चिचखेडे या तिघांना २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांना आता न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आले आहे.

गोंदियात ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनअभावी कोविड रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी आलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्याबाजारात विक्री करून मोठ्या प्रमाणात पैसा कमविण्याच्या नादात असलेल्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. एक इंजेक्शनचे १५००० रुपयाप्रमाणे दोन इंजेक्शनचे ३० हजार रुपयात विक्री केले जात होते. त्या आरोपींनी गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातून हे रेमडेसिविर इंजेक्शन आणल्याचे सांगितले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांच्याकडे होता. आरोपी संजू विकास बागडे, दर्पण नागेश वानखेडे, नीतेश ऊर्फ करण भीमराव चिचखेडे या तिघांविरुध्द गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४२०, १८८, ३४ सह परिशिष्ट २६ औषध नियंत्रण किंमत आदेश २०१३, सहकलम ३ (क), ७ जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५, सहकलम १८ (क), २७ (ख),(दोन) औषधी व सौंदर्यप्रसाधन कायदा १९४० व नियम १९५४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींपैकी नीतेश ऊर्फ करण भीमराव चिचखेडे हा केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात इसीजी टेक्निशियन असल्याचे सांगितले आहे. त्यानेच टेबलवर ठेवलेल्या दोन रेमडेसिविर इंजेक्शन उचलून नेले व त्यांची काळाबाजारात विक्री करण्यासाठी दलाल म्हणून दोघांना ठेवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी होती. ती मुदत संपल्याने न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.