शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा केटीएसमध्ये रेमडेसिविरचा काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 05:00 IST

सागर पटले याच्याकडे ते इंजेक्शन कुठून आले, यासंदर्भात विचारणा केली असता  केटीएस रुग्णालय गोंदिया येथे अधिपरिचारक (स्टाफ ब्रदर) म्हणून कार्यरत असलेला अशोक उत्तमराव चव्हाण, रा. शास्त्री वाॅर्ड, गोंदिया याच्याकडून आणल्याचे सांगितले. अशोक उत्तमराव चव्हाण याला सापळा रचून पकडण्यात आले. त्याने ते इंजेक्शन  केटीएस रुग्णालय, गोंदिया येथील औषध भांडारातून आणल्याचे सांगितले. 

ठळक मुद्देकेटीएसच्या दोन कर्मचाऱ्यांचा समावेश : दोन रेमडेसिविरचे इंजेक्शन जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना रुग्णांना दिल्या जाणा-या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांना पकडले आहे. ही कारवाई ५ मे रोजी रात्रीच्या सुमारास करण्यात आली.दोन्ही कर्मचारी रेमडेसिविर इंजेक्शन १८ हजार रुपये प्रतिदराने विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानंतर, पोलिसांनी  केटीएस रुग्णालयातील सफाई कामगार सागर पटले, रा. मोठा रजेगाव याला इंजेक्शनची विक्री करताना रंगेहाथ पकडले. सागर पटले याच्याकडे ते इंजेक्शन कुठून आले, यासंदर्भात विचारणा केली असता  केटीएस रुग्णालय गोंदिया येथे अधिपरिचारक (स्टाफ ब्रदर) म्हणून कार्यरत असलेला अशोक उत्तमराव चव्हाण, रा. शास्त्री वाॅर्ड, गोंदिया याच्याकडून आणल्याचे सांगितले. अशोक उत्तमराव चव्हाण याला सापळा रचून पकडण्यात आले. त्याने ते इंजेक्शन  केटीएस रुग्णालय, गोंदिया येथील औषध भांडारातून आणल्याचे सांगितले. त्या दोघांच्या ताब्यातून दोन रेमडेसिविर इंजेक्शन व दोन मोबाइल असा एकूण ३२ हजारांचा माल जप्त करण्यात आला. आरोपी सागर राजेंद्र पटले (२०), रा. मोठा रजेगाव, ता. किरणापूर, जि. बालाघाट, अधिपरिचारक अशोक उत्तमराव चव्हाण या दोघांविरुद्ध गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४२०, १८८, ३४  सह परिशिष्ट २६ औषध नियंत्रण किंमत आदेश २०१३, सहकलम ३ (क), ७ जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५, सहकलम १८ (क), २७ (ख),(दोन) औषधी व सौंदर्य प्रसाधन कायदा १९४० व नियम १९५४ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड,  पोलीस उपनिरीक्षक तेजेंद्र मेश्राम, अभयसिंह शिंदे,  पाल कापगते, लीलेंद्रसिंह बैस, चंद्रकांत करपे, राजेंद्र मिश्रा, महेश मेहर, रेखलाल गौतम, तुलसीदास लुटे, अजय राहांगडाले, विजय मानकर, संतोष केदार यांनी केली आहे.

एकाच दिवशी दोन कारवाया  जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. रुग्णांसाठी येणा-या इंजेक्शनची काळ्याबाजारात विक्री केली जात आहे. याची ओरड वाढल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या एकूण चार जणांवर कारवाई केली आहे. कुठे गेले नोडल अधिकारी n खासगी नव्हे तर आता शासकीय रुग्णालयातील रुग्णांसाठी येणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार केला जात असल्याचे पोलिसांनी बुधवारी केलेल्या कारवाईनंतर शिक्कामाेर्तब झाले आहे. काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसेच स्वत:च्या नियंत्रणाखाली रेमडेसिविर इंजेक्शनचे वितरण सुरू ठेवले आहे. पण, यानंतर या इंजेक्शनचा काळाबाजार सुरूच असल्याने नोडल अधिकाऱ्यांचे लक्ष नेमके कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :remdesivirरेमडेसिवीर