शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

हॉट्सअ‍ॅपवरून धार्मिक स्थळाचा अवमान

By admin | Updated: May 17, 2015 01:50 IST

एका विशिष्ट धर्माच्या धर्मस्थळाची अवमानना करून ते फोटो व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पसरविणाऱ्या दोघांवर शहर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

गोंदिया : एका विशिष्ट धर्माच्या धर्मस्थळाची अवमानना करून ते फोटो व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पसरविणाऱ्या दोघांवर शहर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. यातील एक आरोपी गोंदियातील असून दुसरा जळगाव येथील आहे. येथील आयलानी किराणा स्टोर्स समोर राहणाऱ्या हितेश गुरूमुखदास डोडानी (२५) याने आपला मोबाईल क्रमांक ९०२१२१४१४४ वरून व्हॉट्सअ‍ॅपवर शुक्रवारी सकाळी ११.४९ वाजता दरम्यान सद्दाम अयुब शेख (३२) या तरूणाला एक फोटो पाठवला. या फोटोत मुस्लीम बांधवांच्या धार्मिक स्थळाच्या फोटोची अवमानना करण्यात आली होती. या प्रकारामुळे मुस्लीम समाजातील लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याने शेकडो मुस्लीम बांधवांनी शनिवारी (दि.१६) दुपारी पोलीस ठाणे गाठले. या संदर्भात मुश्लीम समाजातील वरिष्ठ नागरिकांनी प्रभारी उपविभागीय अधिकारी दीपक गिऱ्हे यांच्याशी चर्चा केली. यावेळी रामनगरचे ठाणेदार किरणकुमार कबाडी, शहर ठाण्याचे ठाणेदार अविनाश काळदाते, विशेष पथकाचे पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांनी मुस्लीम बांधवांची समजूत घालून परिस्थिती नियंत्रणात आणत त्वरीत भादंविच्या कलम २९५ अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणी हितेश डोडानी यास त्वरीत अटक करण्यात आली. तर जळगाव येथील मोबाईल क्रमांक ८१८०९०२५२९ धारकावरही शहर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.(तालुका प्रतिनिधी)