शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

इटियाडोह प्रकल्पातून पाणी सोडावे

By admin | Updated: July 10, 2017 00:45 IST

एक-दोन दिवस बरसलेल्या पावसाने आता दडी मारल्याने भातलावणी लांबली असून शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

शेतकऱ्यांची मागणी : भातलावणी लांबली लोकमत न्यूज नेटवर्कइटखेडा : एक-दोन दिवस बरसलेल्या पावसाने आता दडी मारल्याने भातलावणी लांबली असून शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. पाऊस लांबल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम पडणार असल्याने भातलावणीसाठी इटियाडोह प्रकल्पातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत. हमखास पाऊस देणारी रोहीणी, मृग व आर्द्रा नक्षत्रे कोरडी गेलीत. मधल्या काळात एक-दोन दिवस पावसाच्या सरी कोसळल्या. वातावरणात गारवा निर्माण झाला. शेतकरीबांधवानी मोठ्या लगबगीने बियाणांची जुळवाजुळव करीत धानाची नर्सरी टाकली. बियाणे रुजले व उगवले व आता लावणीच्या योग्यतेचे झाले तथापी हवामान खात्याच्या पर्जन्यविषयक अंदाजाला पार ठेंगा दाखवत पावसाने दडी मारली. वातावरणात मोठा उष्मा सुरु झाला. शेतकऱ्याच्या नजरा आशाळभूतपणे आकाशाकडे वळल्या आहेत पण पावसाचा पत्ताच नाही. गेलेला पाऊस येईलही पण गेलेला हंगाम येत नाही, असे जुन्या जाणत्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर धानाची नर्सरी रोवण्यायोग्य झाली असतांना शेतशिवारात पाणी नसल्याने भातलावणीचे काम लांबणीवर पडल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो. अशा स्थितीत इटियाडोह सिंचन व्यवस्थापनाने त्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा हंगाम मागे पडू नये यासाठी इटियाडोह प्रकल्पातून रोवण्यासाठी पाणी सोडावे अशी मागणी आहे. आजच्या स्थितीत ज्यांना पाण्याची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी विहीरी, तलाव व बोड्यातून पंपाद्वारे पाण्याचा उपसा करुन भातलावणीचे काम सुरु केले आहे. परंतु याचे प्रमाण अत्यल्प आहे. सर्वच शेतकऱ्यांच्या भात लावणीचे काम सुरु होण्याच्या दृष्टीने इटियाडोह सिंचन व्यवस्थापनाने कालव्याद्वारे पाणी सोडावे अशी मागणी करीत पाणी वापर संस्थांनी यासाठी पाठपुरावा करावा असे शेतकरी बांधव बोलत आहेत. पाण्याअभावी भातलागवडीचे काम करणारा मंजूर वर्ग हाताला काम नसल्याने रिकामा आहे. त्यांनाही रोजगार उपलब्ध होईल ही बाब सिंचन व्यवस्थापनाने लक्षात घ्यावी.