शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
7
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
8
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
9
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
10
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
11
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
12
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
13
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
14
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
15
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
16
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
17
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
18
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
19
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
20
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 

उदासपणा सोडा, पक्ष मजबूत करा!

By admin | Updated: April 6, 2017 01:06 IST

निवडणुकीत हार-जीत लागली असतेच. परंतु काँग्रेस पार्टी व काँग्रेस कार्यकर्ता कधी उदास होत नाही.

गोपालदास अग्रवाल : शहर काँग्रेस कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन गोंदिया : निवडणुकीत हार-जीत लागली असतेच. परंतु काँग्रेस पार्टी व काँग्रेस कार्यकर्ता कधी उदास होत नाही. तो नेहमी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. याच परंपरेला प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याने पुढे न्यावे. गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. परंतु जनतेचे निर्णय स्वीकार करून पुन्हा नव्याने सामान्य नागरिकांच्या हितांसाठी संघर्षाची भूमिका घेवून समोर जावे लागेल, असे मत आ. गोपालदास अग्रवाल यांनी व्यक्त केले. शहीद भोला काँग्रेस भवनात शहर काँग्रेस कमिटीची सभा पार पडली. याप्रसंगी ते मार्गदर्शंन करीत होते. या वेळी नगर काँग्रेस अध्यक्ष अशोकसिंह चौधरी म्हणाले, शहर काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे. मागील निवडणुकीत गोंदिया नगर परिषदेत काँग्रेसचे आठ उमेदवार निवडून आले होते. या वेळी नऊ उमेदवार निवडून आले. आम्हाला अपेक्षेनुसार अंक मिळाले नाही, तरी आम्ही मागे नाहीत. सध्याच्या नगर प्रशासनाच्या काळात शहरातील पथदिवे बंद आहेत. त्याकडे लक्ष न देता नगर प्रशासन केवळ कर वसुलीकडे लक्ष देत आहे. मोठमोठ्या विकासाचे आराखडे नगर प्रशासन तयार करीत होते. परंतु निवडणूक होवून तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही कोणतेही विकास कार्य झाल्याचे दिसून येत नाही. कोणत्याही प्रभागाची कार्यप्रणाली योग्य दिसून येत नाही. या सर्व अपयशाला पुन्हा एकदा काँग्रेस कार्यकर्त्यांनी नागरिकांसमोर आणण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. सभेला प्रामुख्याने जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, प्रदेश प्रतिनिधी पृथ्वीपालसिंग गुलाटी, अजितकुमार जैन, विनोद जैन, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष संदीप ठाकूर, जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष पन्नालाल शहारे, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हा काँग्रेस महासचिव अमर वराडे, दीपक नशिने, शीला इटानकर, मायादेवी जायस्वाल, शहर महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष योजना कोतवाल, नगरसेवक राकेश ठाकूर, क्रांती जायस्वाल, शीलू ठाकूर, शकील हमीद मंसुरी, महेंद्र पुरोहित, सुनील भालेराव, निर्मला मिश्रा, सुनील तिवारी, दीपिका रूसे, भागवत मेश्राम, अमर रंगारी, कविता बनकर, गजेंद्र कवास, कोयल बिसेन, नफीस सिद्धीकी, मंदा कोरे, शिनू राव, दीपा तिवारी, पौर्णिमा रामटेककर, व्यंकट पाथरू, छाया मेश्राम, अजय फेंडारकर, सुशील रहांगडाले, मोहिनी बैस, दर्शना दुबे, लोकेश रहांगडाले, वीणा पारधी, खलील पठान, अनुपमान कोमतपिल्लेवार, मीना महरवड, विशाखा वासनिक, पवन नागदेवे, नंदा महावत, भगतराम ठकरानी आदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)