शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

रिमझिम पावसात गणरायाचे आगमन

By admin | Updated: September 18, 2015 01:31 IST

गुरूवारी सकाळपासूनच बरसत असलेल्या रिमझिम पावसातही जिल्ह्यात गणरायाचे मोठ्या जल्लोषात आगमन होऊन १० दिवसांकरिता प्रतिष्ठापणा करण्यात आली.

उत्साह कायम : ९९० सार्वजनिक मंडळांची श्रीची स्थापनागोंदिया : गुरूवारी सकाळपासूनच बरसत असलेल्या रिमझिम पावसातही जिल्ह्यात गणरायाचे मोठ्या जल्लोषात आगमन होऊन १० दिवसांकरिता प्रतिष्ठापणा करण्यात आली. भर पावसातही गणरायांना वाजतगाजत आणण्यासाठी तरूणाई उत्साहित दिसून आली. ढोल-ताश्यांच्या तालावर सार्वजनिक मंडळांनी गणरायाला मंडपापर्यंत आणून विराजमान केले. दोन दिवसांपासून बरसत असलेल्या पावसामुळे उत्सवावर थोडाफार परिणाम जाणवणार असला तरी पावसाची नितांत गरज असल्याने आनंदाचे वातावरण बघावयास मिळत आहे.राज्याचे आद्यदैवत गणरायांचा १० दिवसांचा उत्सव गोंदिया शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या थाटा-माटात साजरा केला जातो. सुमारे ९९० सार्वजनिक तर चार हजारांवर खाजगी गणेशमूर्तींची स्थापना यावेळी केली जात आहे. गणरायाच्या या उत्सवासाठी मागील महिनाभरापासून तयारी सुरू होती. गणेश मंडळांकडून मूर्ती व मंडप उभारण्यासाठी धावपळ सुरू होती. याशिवाय घराघरांत गणराय येणार असल्याने बालगोपालांपासून वृद्धांपर्यंत सर्वच गणपतीची वाट पाहात होते. गुरूवारी (दि.१७) गणरायांच्या आगमनाचा दिवस उजाडला. सकाळपासूनच सायकल, दुचाकी व चारचाकीतून लाडके गणराय भाविकांच्या घरी आणले जात होते. दुपारनंतर सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती आणण्यास वेग आला. ढोल-ताशांच्या गजरात तरूण नाचत-गात व जयघोष करीत गणरायांना मंडपापर्यंत आणले जात होते. मात्र पावसामुळे डिजे आणि ढोलताशांना काहीसा लगाम लागल्याचे दिसून आले. पावसाचा थेंबही मूर्तीला लागणार नाही यासाठी प्लॅस्टिक कव्हरने झाकले जात होते. मात्र स्वत: तरुणांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला. (शहर प्रतिनिधी)