शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

वनकर्मचाऱ्यांकडून नियमांची व आदेशाची पायमल्ली

By admin | Updated: May 21, 2015 01:01 IST

वनविभागाकून जंगलातील लाकूड चोरी करण्याच्या प्रमाणावर आळा घालण्यासाठी जंगलव्याप्त परिसरातील गावा-गावात वनसमित्या तयार करून लाकूड चोरीचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला.

केशोरी परिसर : जळाऊ लाकडांचा ट्रॅक्टर वनकर्मचाऱ्यांच्या घरीकेशोरी : वनविभागाकून जंगलातील लाकूड चोरी करण्याच्या प्रमाणावर आळा घालण्यासाठी जंगलव्याप्त परिसरातील गावा-गावात वनसमित्या तयार करून लाकूड चोरीचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आदिवासी कुटूंबाना गॅस कनेक्शन पुरवून सरपनासाठी लागणाऱ्या लाकडांचा उपयोग होऊ नये म्हणून उपाययोजना कार्यान्वित केल्या अर्थात या योजनांमुळे जंगलातील लाकूड चोरीचे प्रमाण निश्चितच कमी झाले असले तरीही वन कर्मचारीच नियमांची पायमल्ली करून वनमजुरांच्या सहकार्याने सरपणासाठी लागणारी लाकडे ट्रॅक्टरव्दारे आपल्या घरी बोलावित असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कुंपणच शेत खात असल्याचे यावरून दिसून येते. सरपणासाठी लागणारे जलावू लाकुड आणि मौल्यवान लाकूड जंगलातून चोरी करण्याचा प्रमाणावर आळा बसण्यासाठी शासनाच्या वनविभागाकडून विविध उपाययोजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जंगलव्याप्त भागातील गावा-गावात वनसमित्या निर्माण करून लाकुड चोरीवर नियंत्रण ठेवण्यास शासनाला यश आले. त्याच बरोबर आदिवासी कुटूंबाना गॅस कनेक्शन पुरवून दर महिन्याला सिलींडरचा पुरवठा करण्यामुळे निश्चितच जंगलातील लाकूड चोरी करण्यावर आळा बसला आहे. परंतु केशोरी परिसरातील वनकर्मचाऱ्यांनीच वनमजुरांच्या मार्फत ट्रॅक्टरव्दारे आपल्या घरी जलावू लाकडे आणण्याचे प्रकार सुरू आहे. आदिवासी कुटूंबाना शासनाकडून कमी दरात दर महिन्याला मिळणाऱ्या गॅस सिलींडरचा उपयोग वनकर्मचारी घेत असल्याचे सांगण्यात आले आहे. वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या अधिनस्त काम करत असणाऱ्या लहान कर्मचाऱ्यांना खाजगी कामे किंवा घरगुती कामे सांगू नये? असे शासनाने फर्मावली असतांना सुध्दा वनमजुरांकडून आपल्या घरी जलावू लाकडे पोहचविण्याचे कामे करवून घेतली जात आहेत. याला शासकीय काम म्हणता येईल काय? वनकर्मचाऱ्यांनी आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. तसेच इतर लोकांनी किंवा महिलांनी जंगलातून मोळीभर काड्या आणणे या कर्मचाऱ्यांना खपत नाही तर आपल्या घरी ट्रॅक्टरभर जलावू लाकडे आणण्याचा अधिकार यांना कोणी दिला. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाची वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन वनविभागाच्या नियमांची आदेशाची पायमल्ली करून अवहेलना करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)