शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसांत १४.३२ लाखांची वसुली

By admin | Updated: May 19, 2017 01:30 IST

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाद्वारे नागपूर-गोंदिया-राजनांदगाव-दुर्ग लोहमार्गावरून धावणाऱ्या प्रवासी गाड्या व रेल्वे स्थानकांवर

 विशेष तिकीट तपासणी अभियान : २७४ प्रवासी गाड्या व रेल्वे स्थानकातील कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाद्वारे नागपूर-गोंदिया-राजनांदगाव-दुर्ग लोहमार्गावरून धावणाऱ्या प्रवासी गाड्या व रेल्वे स्थानकांवर १ ते १५ मे २०१७ पर्यंत विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. या १५ दिवसांत दंडस्वरूपात १४ लाख ३८ हजार ९३५ रूपयांची वसुली करण्यात आली. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाद्वारे मंडळ रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात व वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिबल यांच्या नेतृत्वात वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने तिकीट निरीक्षक, वाणिज्य निरीक्षक व रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने मंडळातील नागपूर-गोंदिया-राजनांदगाव-दुर्ग लोहमार्गावरून धावणाऱ्या एकूण २७४ प्रवाशी गाड्या व रेल्वे स्थानकांत विविध विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत विनातिकीट/अनियमित प्रवास तथा माल बुक न करता लगेजच ४ हजार ७५८ प्रकरणे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून दंडस्वरूपात एकूण १४ लाख ३८ हजार ९३५ रूपयांची वसुली करण्यात आली. याशिवाय केरकचरा पसरविणाऱ्यांबाबत ५३ प्रकरणे दाखल करण्यात आली. यात त्यांच्याकडून दंडस्वरूपयात ४ हजार ८०० रूपये वसूल करण्यात आले. सदर विशेष तिकीट तपासणी अभियानांतर्गत गोंदियात किले बंदी चेकिंगदरम्यान सहायक वाणिज्य व्यवस्थापक ओ.पी. जायस्वाल यांच्या पुढाकारात २ मे २०१७ रोजी विनातिकीट/अनियमित प्रवास तथा माल बुक न करताच लगेजचे ६०९ प्रकरणे केवळ एकाच दिवसात नोंद करण्यात आले. त्यांच्याकडून एक लाख ९३ हजार ७०० रूपये दंडस्वरूपात वसूल करण्यात आले.