शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

निराधार वृद्धांची योजनेच्या लाभासाठी ससेहोलपट

By admin | Updated: May 16, 2017 01:03 IST

महाराष्ट्र सरकारने दारिद्र्य रेषेखालील गरजू, गरीब, वृद्ध, निराधार, परितक्ता, विधवा व अपंगाना अर्थसहाय्य देण्यासाठी ...

अनेक वंचित : तहसील कार्यालयात दलाल सक्रियलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र सरकारने दारिद्र्य रेषेखालील गरजू, गरीब, वृद्ध, निराधार, परितक्ता, विधवा व अपंगाना अर्थसहाय्य देण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील निराधार व वृद्ध संबंधित शासकीय कार्यालय, बँकांचे उंबरठे झिजवत आहेत. एवढी ससेहोलपट करुनही लाभ मिळत नसल्याची व्यथा ते व्यक्त करीत आहेत.सामाजातील निराधार, दुर्बल घटकास तसेच निराधार वयोवृद्ध व्यक्तींना जीवन जगण्यासाठी बळ मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे योजनेंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय कुंटुब योजना या योजना राबविल्या जातात. या लाभार्थ्यांना वेळेवर व पारदर्शक पद्धतीने आर्थिक मदत मिळत नाही.त्यामुळे या लाभार्थ्यांना बँकाकडून हेळसांड होत असून काही ठिकाणे निराधारांना अपमानास्पद वागणूक सुद्धा मिळत आहे. तर काही बँकांमध्ये निराधारांचे खाते काढण्यास टाळाटाळ होत आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या लाभार्थ्यांपेक्षा जास्त नागरिक अजून मदतीच्या प्रतिक्षेत असताना प्रशासकीय यंत्रणेकडून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी कुठलीच कारवाई केली नसून एखाद्या पात्र लाभार्थ्यांला या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयाचे वारंवार उंबरठे झिजवून सुद्धा लाभ मिळत नाही. बोगस लाभार्थ्यांना दलालामार्फ त तत्काळ लाभ दिला जात असल्याने या योजनांपासून खरे लाभार्थी वंचित राहिले आहेत.प्रत्येक कार्यालयात दलालांचा सुकसुकाट झाल्याने निराधारांचे आर्थिक शोषण होत आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यात संजय गांधी निराधार समित्यांच्या बैठका वेळच्यावेळी होत नसल्याने लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला मंजूर केले जात नसल्याची स्थिती जिल्ह्यात आहे. निराधार योजनांच्या कार्यालयाला सुद्धा रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. जिल्हास्तरीय कार्यालयात निम्यापेक्षाही जास्त पदे रिक्त असून तालुकस्तरावरील कार्यालयात सुद्धा कर्मचाऱ्यांची वाणवा आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात माहितीचा अभाव असून निराधार नागरिकांचे कामे सुद्धा प्रलंबित आहेत. शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या या अनुदान योजनांचे अनुदान आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. योजनेच्या लाभार्थ्यांपैकी बहुतेक नागरिकांचे जीवन या अनुदानावरच अवलंबून आहे.त्यामुळे अनेक लाभार्थी अनुदानाच्या प्रतिक्षेत असताना पण बऱ्याच वेळा या अनुदानांचे लाभार्थ्यांला वितरण वेळेवर होत नाही. एकतर शासन बँकाकडे वेळच्या वेळी अनुदान पाठवित नाही. पाठविलेच तर बँका लाभार्थ्यांना निर्धारित वेळेत अनुदानाचे वितरण करीत नाही. त्यामुळे या अनुदानासाठी बँकाकडे चकरा मारुन थकून जातात. त्यामुळे बँकाकडून लाभार्थ्यांची नेहमी हेळसांड होत आहे. लाभ मिळवून देण्याच्या नावावर दलाल तहसील कार्यालयात सक्रीय झाले आहेत.