शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

एड्स निर्मूलनासाठी शहरात काढली रॅली

By admin | Updated: December 2, 2015 02:02 IST

जागतिक एड्स दिवस १ डिसेंबरनिमित्त जनजागृती कार्यक्रम कुंवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया, ...

दृष्टी संस्थेचा पुढाकार : विद्यार्थ्यांसाठी वादविवाद, पोस्टर, निबंध स्पर्धागोंदिया : जागतिक एड्स दिवस १ डिसेंबरनिमित्त जनजागृती कार्यक्रम कुंवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया, दृष्टी बहुउद्देशिय विकास संस्था, जनशिक्षण संस्थान, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने पोस्टर स्पर्धा, निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, पथनाट्याचे आयोजन मुख्य बस स्टॅन्ड मरारटोली येथे सकाळी ९.३० वाजता करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य बस स्टॅन्ड व्यवस्थापक गौतम शेंडे होते. उद्घाटन माजी जिल्हा शासकीय वकील विणा बाजपेई, अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवि धकाते, जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर, जिल्हा पर्यवेक्षक संजय जेणेकर, डॉ.चौरसिया, काळे, लक्ष्मीप्रसाद सामंत राय, नेतराम पारधी, आशा ठाकूर, सुदर्शना राकेश वर्मा, सरिता बुडेकर, सुनील येवले उपस्थित होते. यात समाजसेवी संस्था व बीएचजे कॉलेलच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.एड्स निर्मूलनाचा शपथविधी कार्यक्रमात सर्व पाहुण्यांनी भाग घेतला. डॉ. रवि धकाते यांच्याद्वारे एड्स जनजागृती रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा श्रीगणेशा करण्यात आला. एड्स जनजागृती रॅली मरारटोली बस स्थानकापासून शहराच्या विविध मार्गाने घोषवाक्याच्या गजरात नैतिकता पाळा, एड्स टाळा, संयम से सुरक्षा, जवान हूँ, नादान नही, क्षणाची मजा एड्सची सजा, असता घरी सुंदर स्त्री का जात दुसऱ्याच्या घरी, जगा आणि जगू द्या, कंडोम वापरा एड्स टाळा, नाही लस नाही उपचार, प्रतिबंध हाच आधार, जागरुक व्हा सुरक्षित राहा आदी घोषवाक्यासोबत पंचायत समिती कॉलनी ते बालाघाट रोड मरारटोली बस स्टॅन्डमध्ये रॅलीचे समापन करण्यात आले. समाजाचा भ्रम दूर हो, जन चेतना होणे अत्यावश्यक आहे या उद्देशाला घेऊन एड्स दिवसाचे पालन करण्यात आले.संचालन व आभार प्रकाश बोपचे यांनी केले. यशस्वितेकरिता विनायक डोंगरवार, महेश बिसेन, अजय खवसकर, रिना डोंगरवार, विवेक करोले, शुभांगिनी बन्सोड, शशीकला तिवारी, रामू कोटांगले, दीपक उईके यांनी सहकार्य केले. विद्यार्थी सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)