शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नवतपाच्या उष्णतेवर पावसाचा उतारा

By admin | Updated: June 3, 2016 01:39 IST

नवतपा म्हणताच अंगाला घाम फुटू लागतो व जीवाला धसका बसतो. मात्र यंदाच्या नवतपाला पावसाचा थंडावा मिळाल्याने नवतपा पाहिजे तसा तापलाच नाही.

तापलेच नाही : १४ व १५ मे रोजी सर्वाधिक तापमानाची नोंदगोंदिया : नवतपा म्हणताच अंगाला घाम फुटू लागतो व जीवाला धसका बसतो. मात्र यंदाच्या नवतपाला पावसाचा थंडावा मिळाल्याने नवतपा पाहिजे तसा तापलाच नाही. विशेष २५ मे ते २ जूनपर्यंतच्या नवतपाच्या कार्यकाळातील तापमानापेक्षा जास्त तापमान मे महिन्यात आधीच म्हणजे १४ व १५ मे रोजी नोंदल्या गेले होते. त्यामुळे यावेळचा नवतपा बऱ्याच प्रमाणात सुसह्य झाला.निसर्गाने उन्हाळा, हिवाळा व पावसाळा असे तीन ऋतूंचे चक्र बांधून दिले आहे. मात्र मानवाच्या स्वार्थीपणामुळे झाडांचे जंगल नष्ट होऊन सिमेंट कॉंक्रीटचे जंगल वाढू लागले आहे. याचा परिणाम ऋतूचक्रावर झाला असून पर्यावरण प्रदूषित झाले आहे. उन्हाची दाहकता वाढत चालली असून पावसाळ््यात पाहिजे तसा पाऊस पडत नाही. निसर्गाशी छेडखानीचे हे परिणाम आता आपल्या समोर येवू लागले आहेत. हेच कारण आहे की पूर्वी ४० डिग्रीच्या वर न जाणारे तापमान आता ४५ अंशांपेक्षा वर जाऊ लागले आहे. नवतपा म्हटला म्हणजे रविराज पृथ्वीच्या जवळ येऊन आग ओकू लागल्याचा काळच म्हटला जातो. अवघ्या उन्हाळ््यातील उन्ह या नऊ दिवसांत पडत असल्याचेही नवतपाबाबत बोलले जाते. यामुळेच नवतपा म्हटला की सुर्यदेव सर्व काही भाजून काढणार एवढ्या तापमानाची कल्पना केली जाते. नवतपाच्या या नऊ दिवसांत नशिबाने सुर्यदेव खरोखरच आग ओकून आपली ताकत दाखवून देतात. यंदा मात्र २५ मे पासून सुरू झालेल्या नवतपाला पावसाने आपला थंडावा दिल्याने नवतपा पाहिजे तसा तापला नाही. कारण यंदा नवतपाच्या काळात बहुतांश दिनी वरूणराजाने आपली हजेरी लावून तापमान नियंत्रणात आणले. २ जून पर्यंत असलेल्या नवतपातील तापमानाची नोंद जाणून घेतली असता १ मे रोजी सर्वाधीक ४३.५ डिग्री होते. नवतपाच्या पूर्वीच्या काळात यापेक्षा जास्त नोंद घेण्यात आली असल्याने यंदाच्या नवतपावर पावसाने पाणी फेरल्याचे दिसले. (शहर प्रतिनिधी)