शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

गेल्यावर्षीपेक्षा जास्त पाऊस

By admin | Updated: September 19, 2015 02:46 IST

पंधरवड्यापासून दडी मारलेल्या पावसाचे आणि यावर्षी बऱ्यात अंतराअंतराने हजेरी लावत असलेल्या पावसाने सर्वांचाच जीव टांगणीला लागला होता....

तीन दिवसात बॅकलॉग भरला : आतापर्यंत ८१.६ टक्के, मागील वर्षी होता ७४.६ टक्केगोंदिया : पंधरवड्यापासून दडी मारलेल्या पावसाचे आणि यावर्षी बऱ्यात अंतराअंतराने हजेरी लावत असलेल्या पावसाने सर्वांचाच जीव टांगणीला लागला होता. मात्र १५, १६ व १७ सप्टेंबर रोजी झालेल्या जोरदार पावसाने बॅकलॉग भरून काढत गेल्यावर्षीची सरासरी पार केली. मागील वर्षी जिल्ह्यात १८ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ९४०.१ मिमी (७४.६ टक्के) पाऊस झाला होता. यंदा १०२८.३ मिमी (८१.६ टक्के) पाऊस पडल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.पावसाच्या अभावाने काही ठिकाणी धानपीक वाळण्याच्या मार्गावर होते. दमट वातावरणामुळे पिकांवर अनेक रोग पसरले होते. परंतु तीन दिवसाच्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले. त्यातच गादमाशी व खोडकिड्यांच्या प्रादुर्भाव कमी झाला. आता आणखी १० ते १२ दिवस पाऊस पडला नाही तरी पिकांवर विपरित परिणाम होणार नाही, असे कृषी विभागातून सांगण्यात आले. सदर तीन दिवसांत आलेल्या पावसाचा लाभ सर्व प्रकारच्या पिकांना झाला आहे. मागील वर्षी ज्या-ज्या वेळी पाण्याची पिकांना गरज होती, त्या-त्या वेळी पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न झाले होते. यंदा आतापर्यंतची स्थिती पाहता पाऊस पडण्याच्या काळात मोठा कालखंड दिसून येत आहे. सतत दोन दिवस पाऊस आल्यानंतर १५ ते २० दिवसपर्यंत पाऊस पडत नाही. पिकांना गरजेच्या वेळीच पाणी मिळत नसल्याने उत्पन्नात घटसुद्धा होवू शकते. यंदाच्या पावसाने मागील वर्षाची सरासरी ओलांडली असली तरी गॅप मोठी असल्याने शेतकरी वर्ग काहिसा चिंतीत दिसून येत आहे. (प्रतिनिधी)