शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस व वादळाने झोडपले

By admin | Updated: June 3, 2015 01:11 IST

तालुक्यात ३१ मे रोजी ४६ डिग्री सेल्सिअस तापमान भिषण गर्मीची दाहक होती. अशातच रात्री ११.३० वाजता निसर्गाने आपले रंग बदलविले.

अर्जुनी-मोरगाव : तालुक्यात ३१ मे रोजी ४६ डिग्री सेल्सिअस तापमान भिषण गर्मीची दाहक होती. अशातच रात्री ११.३० वाजता निसर्गाने आपले रंग बदलविले. प्रचंड विजेच्या कडकडासह अवकाळी पावसाने व वादळाने थैमान घातले. या वादळी पावसात रबी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात शेकडो वृक्षासह शेकडो घरे अंशत: पडली असून महसूल विभागाच्या वतीने पंचनामे सुरू आहेत. गेल्या ६० ते ७० वर्षाच्या काळातही एवढा विजांचा कडकडाट कुणी ऐकल्याचे सांगत नाही. या कडकडामुळे तालुक्यातील नागरिक भयभीत झाले होते. यात जिवीतहाणी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचे निदर्शनास येत आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ३१ मे ची रात्र सदैव आठवणीत राहील असा प्रचंड विजेचा कडकडाट लोकांनी पहिल्यांदाच अनुभवला. या वादळी पावसात तालुक्यातील रबीचे पिकांचे व फळभाजी पिकांचे लाखोचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील कुंभीटोला येथील प्रगतशील शेतकरी विजयसिंह राठोड यांचे शेतातील १७ केळीची बाग या वादळामुळे पूर्णत: उध्वस्त झाली. ऐन केळी लागण्याच्या उंबरठ्यावर असतांना या वादळाने केळीचे झाडे उन्मळून पडली. त्यामुळे सदर शेतकऱ्यांचे दोन लाखाचे जवळपास नुकसान झाले आहे. बोंडगावदेवी येथील कुशन झोळे, विहीरगाव येथील विश्वनाथ वालदे यांनी आपल्या शेतात तयार केलेले शेडनेट खांबासह उडाल्याने दोघाही शेतकऱ्यांचे दिड लाख रूपये प्रत्येकी असे तिन लाखाचे नुकसान झाले. शेडनेट मध्ये असणारी कारले पिक पूर्णत: उध्दवस्त झाले. मागील वर्षीसुध्दा याच शेतकऱ्यांचे गारपिटीने लाखो रुपयाचे टरबूज पिक नेस्तनाबूत झाले. या वादळात तालुक्यातील अनेक गावात शेकडो वृक्ष कोसळले. अर्जुनी-मोरगाव मंडळात देवलगाव ३ घरे, बाराभाटी ५ घरे, मोरगाव ३० घरे, अर्जुनी-मोरगाव ४० घरे, निमगाव ३० घरे, धाबेटेकडी १० घरे अंशत: पडली आहेत. ३ लाख ३ लाख २७ हजाराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पूर्ण गावातील पंचनामे मंगळवारी दुपारी २ वाजतापर्यंत तहसील कार्यालयाला येण्यास असल्याने नुकसानीचा आकडा बरोबर मिळू शकला नाही. मात्र संपूर्ण तालुक्यातच शेकडो घरे पडल्याची माहिती आहे. चान्ना/बाक्टी येथे जगन रेवतीराम लोगडे यांचे घरावर विज पडल्याने घरातील सामानाचे बरेच नुकसान झाले आहे. ६० ते ७० हजाराचे नुकसान प्राथमिक अंदाज आहे. अर्जुनी-मोरगाव शहरात लघु व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांचे दुकाने वादळाने उडवून नेली. यात हजारोचे नुकसान झाले आहे. अर्जुनी-मोरगाव येथे रामदेव राईस मिल तथा श्रीकृष्ण राईस मिलच्या गोदामातील टीन उडाल्याने लाखो रुपयाच्या तांदळावर पाणी गेल्याने तांदूळ खराब झाले आहे. या वादळामुळे रात्री १२ वाजतापासूनच विज पुरवठा खंडीत झाला आहे. अवकाळी पाऊस व प्रचंड वादळी पावसाने अक्षरश: अर्जुनी-मोरगाव तालुक्याला झोडपून काढले. (तालुका प्रतिनिधी)