शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार

By admin | Updated: May 30, 2015 01:16 IST

रेल्वे स्थानकात अनेक दिवसांपासून तिकिटांचा काळाबाजार सुरू आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाच्या जवान आपली दृष्टी रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर ठेवून आहेत.

तत्काळच्या बुकींमध्ये गडबड : तिरोडा स्थानकाच्या काऊंटर क्लर्कला अटकगोंदिया : रेल्वे स्थानकात अनेक दिवसांपासून तिकिटांचा काळाबाजार सुरू आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाच्या जवान आपली दृष्टी रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर ठेवून आहेत. तसेच संदिग्ध तिकीट दलालांच्या ठिकाणांवरही गुप्त नजर ठेवली जात आहे. अशाच एका प्रकरणात तिरोडा रेल्वे स्थानकावर कार्यरत बुकिंग क्लर्कला तिकिटांचा काळाबाजार करताना पकडण्यात आले आहे.रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक एस.यू. डोंगरे यांनी रेल्वे आरक्षण केंद्र तिरोडा येथे गुप्तपणे पहारेदारी ठेवली होती. दरम्यान सकाळी १० वाजता बुकिंग क्लर्कने स्वत:जवळ ठेवलेले तत्काल आरक्षण आवेदन फॉर्मांवर तिकीट काढून आपल्या ताब्यात ठेवले. यानंतर बाहेरील व्यक्तींच्या नावावर आरक्षण आवेदनानुसार तत्काल तिकिटे जारी केले. याबाबत संशय आल्यावर कार्यरत स्थानक व्यवस्थापक तिरोडा यांना आवेदन देवून प्रकरण समरी तसेच तत्काल तिकिटांचे विवरण तपासण्याची परवानगी मागण्यात आली. परंतु स्थानक व्यवस्थापकाने लिखित स्वरूपात सांगितले की, लाईन क्लियर ड्युटीमध्ये व्यस्त असल्यामुळे ड्युटीनंतरच बुकिंग कार्यालयात जावू शकू. अशास्थितीत बाहेरील दोन साक्षीदारांना तिरोडा आरक्षण केंद्रात बोलविण्यात आले. बुकिंग क्लर्क उमेशकुमार टेंभरे याला सांगून बुकिंग कार्यालयाचा दरवाजा उघडण्यात आला. दरम्यान बुकिंग क्लर्कने आपल्या ताब्यात लपवून ठेवलेले आरक्षण तिकीट तसेच मागणी पत्रांना आपल्या मुठ्ठीत दाबून फेकण्याचे प्रयत्न केले. परंतु रेल्वे सुरक्षा दलाच्या टास्क चमूने आरक्षण तिकिटांना पकडले. कनिष्ठ बुकिंग क्लर्क उमेशकुमार याच्या ताब्यातून तिकिटे व मागणी पत्र जप्त करण्यात आले. त्याने सांगितले की, एका दिवसापूर्वी गोंदिया येथील रहिवासी विशाल गिलानी याच्या आवेदनावर त्याने तत्काल आरक्षण तिकीट काढली. यापूर्वीसुद्धा अनेकदा कमिशन घेवून त्याने विशालसाठी आरक्षण तिकिटे दिल्याची बाब स्वीकार केली. चौकशी दरम्यान दैनिक टर्मिनल केस समरी साक्षीदारांसमोर बुकिंग क्लर्कने काढली. यात एकूण रक्कम २६ हजार ०४५ रूपये दिसून आले. तत्काल तिकिटे व सामान्य तिकिटांची एकत्रित रक्कम त्यावेळी २४ हजार ३१५ रूपये आढळली. अर्थात एक हजार ७३० रूपये कमी आढळले. यासाठी बुकिंग क्लर्कने स्वत:ला जबाबदार सांगितले. विशाल गिलानी रेल्वे आरक्षण तिकिटांचा अवैध व्यापार करतो व रेल्वे तिकिटांच्या काळ्या बाजारात संलग्न असल्याची बाब बुकिंग क्लर्कने स्वीकार केली. (प्रतिनिधी)अवैध विक्रेत्यांवर कारवाईदक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेकडून अनधिकृत विक्रेत्यांविरूद्ध (वेंडर) एक तपासणी अभियान राबविण्यात आले. यात ४३ प्रकरणे नोंद करण्यात आले. तर एक ६१२ प्रकरणे रेल्वे अधिनियमाच्या विविध कलमान्वये दाखल करण्यात आले. यात १ लाख १६ हजार ७५५ रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.