शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावर मात करणाऱ्यांची घोडदौड सुरुच,संसर्ग आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 05:00 IST

जिल्ह्यात रविवारी ६६२ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली तर ५७२ नवीन रुग्णांची नोंद झाली. पाच रुग्णांचा उपचारादरम्यान खासगी आणि शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. रविवारी आढळलेल्या ५७२ रुग्णांमध्ये सर्वाधिक २४७ रुग्ण हे गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा २७, गोरेगाव ६४, आमगाव ३७, सालेकसा ०४, देवरी ८१, सडक अर्जुनी ९४, अर्जुनी मोरगाव १२ आणि जिल्ह्याबाहेरील ६ रुग्णांचा समावेश आहे.

ठळक मुद्दे६६२ बाधितांची मात : ५७२ नवीन रुग्ण : ५ रुग्णांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सध्या सर्वत्र कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे सारेच हैराण आहेत. मात्र, गोंदिया जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून कोरोनावर मात करणाऱ्यांची घोडदौड सुरुच असल्याचे दिलासादायक चित्र आहे. मागील आठ दिवसांच्या कालावधीत सात हजारांवर बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात रविवारी ६६२ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली तर ५७२ नवीन रुग्णांची नोंद झाली. पाच रुग्णांचा उपचारादरम्यान खासगी आणि शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. रविवारी आढळलेल्या ५७२ रुग्णांमध्ये सर्वाधिक २४७ रुग्ण हे गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा २७, गोरेगाव ६४, आमगाव ३७, सालेकसा ०४, देवरी ८१, सडक अर्जुनी ९४, अर्जुनी मोरगाव १२ आणि जिल्ह्याबाहेरील ६ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत १,३५,३३२ जणांचे स्वॅब नमुने तपासण्यात आले. त्यापैकी १,०९,८५१ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजेन चाचणी केली जात आहे. या अंतर्गत आतापर्यंत १,३८,०१९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १,०९,२३० नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३४,१६५ बाधित आढळले असून, यापैकी २८,२१५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ५,४०० कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, ४,६८१ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहे. 

१ लाख ६३ हजार नागरिकांचे लसीकरण कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी उपाय आहे. या अंतर्गत १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस दिली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख ६३ हजार ४८८ नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. एकूण १४० केंद्रांवरुन ही प्रक्रिया सुरु आहे तर १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यासाठी जिल्ह्यात शनिवारपासून पाच केंद्र सुरु करण्यात आली आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या