शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

रबीसाठी अधिक मिळाले पाणी

By admin | Updated: June 4, 2015 00:57 IST

रबी धान पिकाचे उत्पन्न जिल्ह्यातील आठही तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात घेण्यात येत आहे. रबी पिकामुळे उत्पन्न चांगले येणार असल्याने शेतकारी आनंदित झाले आहे.

कापणी-मळणी जोमात : चांगले उत्पन्न येण्याचे संकेतगोंदिया : रबी धान पिकाचे उत्पन्न जिल्ह्यातील आठही तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात घेण्यात येत आहे. रबी पिकामुळे उत्पन्न चांगले येणार असल्याने शेतकारी आनंदित झाले आहे. ज्यांना सिंचनासाठी पाणी मिळणार नव्हते त्यांनाही पाणी मिळाल्यामुळे शेतकरी आनंदीत झाले आहेत. बाघ ईटीयाडोह आमगाव व गोंदिया तालुक्यात सिंचनाचे नियोजन करुन ९६० हेक्टर शेतीला पाणी देण्याचे ठरविण्यात आले होते. परंतु बाघ ईटियाडोहने दीड हजार हेक्टर शेतीला पाणी दिले. ५४० हेक्टर शेतीत रबी पिकाचे अधिक उत्पादन घेतल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदित झाला आहे. सालेकसा तालुक्यात २१० हेक्टर शेती सिंचनाखाली आणण्याचे नियोजन करण्यात आले होते. बाघ पाटबंधारेच्या पाण्यातून १२०० हेक्टर शेती सिंचनाखाली आणली. सालेकसा तालुक्यात ९९० हेक्टर शेती अधिक सिंचनाखाली आणण्यात आली. उशिरा लावलेली रबी पिके आठवडाभरात कापून त्यांची मळणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व मोठ्या जलाशयांमध्ये मुबलक पाणी असल्यामुळे जणावरांनाही याचा फायदा होत आहे. धरण व तलावांमध्ये काही प्रमाणात पाणी असल्यामुळे मान्सून थोडा लांबला तरी शेतकऱ्यांना चिंता करावी लागणार नाही. मागील वर्षी पाऊस कमी पडला होता. त्या मानाने जिल्ह्यात रबी पीक जास्त क्षेत्रात घेण्यात आले. यावर्षी सुरवातीला आलेल्या अकाली पावसाने रबी धान पिकाला संजीवनी दिली. परंतु गर्भावस्थेत धान असताना तसेच कापणीवर धान येताच पावसाने झोडपल्यामुळे चांगले उत्पन्न ही आशा उराशी बाळगून असलेल्या शेतकऱ्यांच्या मनात निराशा निर्माण झाली. (तालुका प्रतिनिधी)अकाली पावसाने झाले नुकसानअर्जुनी-मोरगाव येथे सोमवारच्या पहाटे झालेल्या पावसामुळे धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांचे धान शेतात पडले आहेत त्यांचे नुकसान झाले आहे. धानाच्या ढिगाऱ्यावरही पाणी गेल्यामुळे तेही धान खराब झाले आहे. १५ दिवसांपूर्वी सडक-अर्जुनी तालुक्यात गारपिटीसह आलेल्या पावसाने धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चांगले उत्पन्न हातात येईल, अशी अपेक्षा असताना शेतकऱ्यांच्या तोंडचा घास निसर्गाने हिरावण्याचा प्रयत्न केला. सतत चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्याला निसर्गानेही बुचकळ्यात टाकले आहे.शेतीत महिलांचा पुढाकारसालेकसा तालुक्यात राज्य सरकारद्वारे संचालित महिला आर्थिक विकास महामंडळाने केंद्राच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची साथ घेऊन सालेकसा तालुक्यात ७७ हेक्टर शेतीत धान पिकाची लागवड केली. या अभियानात २३४ महिलांचा समावेश आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी या २३४ महिलांचे काम पाहून आनंद व्यक्त करीत आहे. आता खरीप पिकासाठी ३०० हेक्टर जमिनीत धान पीक लावले जाणार आहे. यामध्ये ५०० पेक्षा अधिक महिलांना या योजनेने जोडले जाणार आहेत.