शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

टाकलेल्या कागदावर लिहिणारा छंदवेडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2017 00:24 IST

कुदरत का करिश्मा है! माणूस खरच किती बुद्धिमान, गुणवान आहे, असाच एक शेणामातीच्या घरात वास्तव

अनेक साहित्यांचे लिखाण : मांडले जोपासतात २३ वर्षापासून लेखनछंद बाराभाटी : कुदरत का करिश्मा है! माणूस खरच किती बुद्धिमान, गुणवान आहे, असाच एक शेणामातीच्या घरात वास्तव करणारा आणि रोज वृत्तपत्रांच्या कागदावर साहित्य लेखन करणारे कवी म्हणजे मुन्ना मंडले होय. साहित्य व सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या अर्जुनी-मोरगाव येधील कुंभीटोलाचे मुलचंद उर्फ मुन्ना मंडले असे या साहित्यीकांचे नाव आहे. वयाच्या ३६ व्या वर्षापासून लेखन कार्याला त्यांनी सुरूवात केली. आज ही ६३ व्या वर्षी त्यांचे लेखन कार्य सुरू आहे. त्याचा जन्म अर्जुदा टिकरी (ता.जी. दुर्ग) येथे झाला. शिक्षण फक्त पाचवी पास आहे. मात्र या माणसाच्या साहित्यावरून खूप मानवी मूल्यात भर पडते. त्यांच्या लेखनाचे नानाविध प्रकार आहेत. १०० सुविचार, दहा मधुरवाणी १५० कविता, ५० गीत, २०० भजन नानाविध गझल मुशायरा, अभंग, डोली, देशभक्ती, बालगीतांचा मंडलेंचा संग्रह आहे. शिक्षण, ज्ञान, आत्मविश्वास अशी त्यांची ध्येय दृष्टी आहे. पण त्यांचे कोणतेही साहित्य प्रकाशीत झाले नाही. हिंदी व मराठी भाषेत त्यांचे साहित्य आहे. त्याचप्रमाणे पाच वर्षामध्ये २०-३० लोककलेची किर्तनेसुध्दा त्यांनी लिहीली आहेत. विशेष म्हणजे साहित्य जपतानाच मंडलेंचा सामाजिक कार्यातही महत्वाचा वाटा आहे. मागील १० वर्षापासून ते बौध्द धर्माचा प्रचार-प्रसार करीत आहेत. (वार्ताहर)