शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

जलदूत होऊन भागवितो ३०० कुटुंबांची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:20 IST

सौंदड : जिल्ह्यात प्रशासनाच्या नियोजनशून्य धोरण आणि कोरोनाच्या संकटामुळे पाणीटंचाईची समस्या उद्‌भवत आहे. जिल्ह्यातील अनेक गावे तहानलेली आहेत. सडक ...

सौंदड : जिल्ह्यात प्रशासनाच्या नियोजनशून्य धोरण आणि कोरोनाच्या संकटामुळे पाणीटंचाईची समस्या उद्‌भवत आहे. जिल्ह्यातील अनेक गावे तहानलेली आहेत. सडक अर्जुनी तालु्क्यातील सौंदड येथे पाणीटंचाई आहे. या गावाजवळ चूलबंद नदी आहे. मात्र, ती कोरडीठाक पडल्याने गावातील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गावाची पाणीटंचाई दूर करण्यासाठी ३० वर्षीय रोशन शिवणकर हा जलदूत म्हणून धावून आला आहे.

दररोज तो तब्बल तीनशे कुटुंबीयांना टँकरद्वारे तब्बल दीड लाख लीटर पाणी मोफत पुरवितो. पाणीटंचाई गोंदिया जिल्ह्याच्या पाचवीला पुजलेली आहे. मागील तीन वर्षांत ही समस्या भीषण रूप धारण करू लागली आहे. लोकांनाच पिण्यासाठी पाणी नसल्याने जनावरांना काय पाजणार, असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनावरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अशीच भीषण परिस्थिती सौंदडची आहे. या गावाला पाणीपुरवठा करणारी चूलबंद नदीच कोरडीठाक पडल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांपासून तर लहान बालकांमध्येही आणीबाणी दिसून येत आहे. ही बाब रोशन शिवणकर या तरुणाच्या लक्षात आली. तेव्हा त्याने प्रशासनाकडून रीतसर परवानगी घेत, गावातील शेतकऱ्यांच्या शेतातून टँकरद्वारे पाणी आणून तो नागरिकांची तहान भागवत आहे. दरवर्षीच्या उन्हाळा हा सौंदड गावासाठी सर्वात कठीण काळ असतो. या वर्षी ही पाणीटंचाई आहे, पण ती निव्वळ उन्हाळ्यामुळे नाही, नियोजनाचा अभाव आणि पाण्याचा अवास्तव वापर या कारणामुळे आहे. सोबतच कोरोनाच्या संकटामुळे पाणीटंचाईकडे दुर्लक्ष झाल्याचे अधिकारी सांगतात, परंतु यंदा रोशनसारखा जलयुवक नागरिकांसाठी जलदूत म्हणून धावून आला नसता, तर नक्कीच पाण्यासाठी मोठी आणीबाणी निर्माण झाली असती, हे मात्र खरे. त्यामुळे प्रशासनाने कायमस्वरूपी सौंदड येथील पाणीटंचाईवर उपाय शोधल्यास रोशन शिवणकरसारख्या जलदूताला नागरिकांवर आलेली पाणीटंचाई दूर करण्यास धावून येण्याची गरज पडणार नाही.