शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

एकस्तर वेतनश्रेणी लाभ व नक्षलभत्ता द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:00 IST

निवेदनात, १० ते १२ वर्षात पदोन्नती होणे अभिप्रेत आहे. परंतु त्याऐवजी कालबद्ध स्वरूपात आर्थिक पदोन्नती दिली जात आहे. कालबद्ध पदोन्नती घेतल्यावरही एकस्तर वेतन निश्चिती करणे व नक्षलग्रस्त भागातून निघाले नसल्यामुळे देय करणे तर्कसंगत असल्याचे म्हटले आहे. एकस्तर श्रेणी ही नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असेपर्यंत लागू असते. मात्र १२ वर्षानंतर तो कर्मचारी त्या भागातून बाहेर पडताच त्याची वेतनश्रेणी कमी करण्यात येते.

ठळक मुद्देग्रामसेवक युनियनची मागणी : विधानसभा अध्यक्षांना दिले मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ तसेच नक्षलग्रस्त भत्त देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने करण्यात आली आहे. यासाठी युनियनच्यावतीने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना निवेदन देण्यात आले आहे.निवेदनात, १० ते १२ वर्षात पदोन्नती होणे अभिप्रेत आहे. परंतु त्याऐवजी कालबद्ध स्वरूपात आर्थिक पदोन्नती दिली जात आहे. कालबद्ध पदोन्नती घेतल्यावरही एकस्तर वेतन निश्चिती करणे व नक्षलग्रस्त भागातून निघाले नसल्यामुळे देय करणे तर्कसंगत असल्याचे म्हटले आहे. एकस्तर श्रेणी ही नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असेपर्यंत लागू असते. मात्र १२ वर्षानंतर तो कर्मचारी त्या भागातून बाहेर पडताच त्याची वेतनश्रेणी कमी करण्यात येते. हे तर्कसंगत नसून एकस्तर वेतनश्रेणीला संरक्षण देवून कालबद्ध पदोन्नतीची मागणी करण्यात आली आहे.याकरिता शासन स्तरावर सुधारित शुद्धीपत्रक काढून न्याय देण्यात यावा. तसेच १ नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्ती आदेश देण्यात आलेल्या सर्वांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी या मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देताना ग्रामसेवक संघटनेचे विभागीय अध्यक्ष कमलेश बिसेन, मानद अध्यक्ष कार्तिक चव्हाण, सचिव दयानंद फटींग, लक्ष्मण ठाकरे, सचिन कुथे, धर्मेंद्र पारधी, अरूण हातझाडे, नीशीकांत मेश्राम, गणेश मुनेश्वर व बहेकार उपस्थित होते.वरिष्ठ सहायक पदलमवार यांना हटवापंचायत विभागात कार्यरत वरिष्ठ सहायक पदलमवार यांची प्रशासकीय बदली होवूनही गेल्या २ वर्षांपासून ते याच कार्यालयात कार्यरत आहेत. एकाच टेबलावर कार्यरत असल्याने प्रशासकीय बदली करण्यामागच्या उद्देशाला बगल दिली जात असून ग्रामसेवकांच्या सेवाविषयक बाबीत अनेकदा हस्तक्षेप करित असल्याच्या तक्र ारी संघटनेला मिळाल्या आहेत. त्यामुळे वरिष्ठ सहायक पदलमवार यांना बदलीच्या ठिकाणी तत्काळ कार्यमुक्त करण्यात यावे या मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना २९ जुलै रोजी ग्रामसेवक संघटनेने दिले आहे. त्या निवेदनाला १५ दिवसांचा कालावधी लोटूनही पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी केराची टोपली दाखविली आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी