शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
2
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
3
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
4
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
5
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
6
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
7
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
8
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
9
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
10
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
11
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
12
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
13
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
14
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
15
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
16
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
17
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
18
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
19
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
20
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश

दिव्यांगांच्या विकासासाठी तीन टक्के निधी द्या

By admin | Updated: March 20, 2017 01:01 IST

दिव्यांग हा समाजातील अविभाज्य घटक आहे. त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी सन १९९५ च्या समान हक्क, समान संधी,

आंदोलनाचा इशारा : नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन गोंदिया : दिव्यांग हा समाजातील अविभाज्य घटक आहे. त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी सन १९९५ च्या समान हक्क, समान संधी, अपंग पुनर्वसन कायद्यांतर्गत व महाराष्ट्र शासनाच्या २०१३ च्या शासन निर्णयाप्रमाणे सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थसंकल्पाच्या तीन टक्के निधीची दिव्यांग विकासासाठी तरतूद करावी. तसेच दिव्यांगांची नोंद घेवून सदर निधी खर्च करावा, असे अपेक्षित असतानाही प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे दिव्यांगांकडे दुर्लक्ष करून गोंदिया व तिरोडा नगर परिषदांची याची दखल घेतली नाही. अपंग कल्याणकारी संघटनेचे सचिव दिनेश पटले व शहर प्रमुख आकाश मेश्राम यांच्या नेतृत्वात नगर परिषद गोंदिया येथे नगराध्यक्ष अशोक इंगळे व मुख्याधिकारी चंदन पाटील यांची भेट घेवून दिव्यांगांच्या समस्या व मागण्या यांच्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली व निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार, दिव्यांग व्यक्तींना मिळकत व घर करामध्ये कुटुंब प्रमुखाची अट न लावता ५० टक्के सवलत देण्यात यावे. व्यवसाय करण्यासाठी गाळे द्यावे. बचत गटांना व्यावसाईक प्रोत्साहनपर अनुदान द्यावे. स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य म्हणून पीठ गिरणी, शिलाई मशीन, मिर्ची कांडप मशीन, फुड प्रोसेसिंग मशीन, ऊस ज्युस मशीन, झेरॉक्स मशीन, डीटीपी जॉबवर्क्ससाठी संगणक संच किंवा रस्त्याच्या कडेला लावता येईल असा लोखंडी व्हेंडिंग स्टॉल द्यावे. गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर अनुदान द्यावे. व्यायसायिक गाळे खरेदीसाठी आर्थिक सहाय्य द्यावे. राहणीमान उंचावण्यसाठी घरगुती वस्तू सौर कंदील, सौर बल्व आदी साहित्य द्यावे. बॅटरीचलित तीनचाकी सायकल द्यावे. दिव्यांगांसाठी सल्ला व मार्गदर्शन केंद्र स्थापन करावे. शौचालय व घरकूल योजनेत दिव्यांगांना प्राधान्य द्यावे. सन २०१५-१६ व २०१६-१७ या आर्थिक वर्षांच्या अनुशेषासह तीन टक्के निधी, उपरोक्त दिव्यांग विकास आराखडा व शहरातील दिव्यांगांची संख्या यांची सांगड घालून प्राधान्यक्रमानुसार व संघटनेला विश्वासात घेवून सदर निधी खर्च करण्यात यावा, अशा विविध मागण्यांचा समावेश आहे. याप्रसंगी संघटनेच्या शिष्टमंडळात अध्यक्ष दिगंबर बन्सोड, सचिव दिनेश पटले, कोषाध्यक्ष आकाश मेश्राम, शहर अध्यक्ष विनोद शेंडे, शहेबाज शेख, राखी चुटे, चंद्रशेखर कुंभरे, शोभेलाल भोंगाडे, सीमा श्रीवास्तव व शहरातील दिव्यांग उपस्थित होते. नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी १५ एप्रिलपर्यंत मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले व आंदोलन करण्याचा प्रसंग येणार नाही, असे संघटनेला सांगितले. तरी संघटेनचे समाधान झाले नाही तर आंदोलन करण्यात येईल, असे संघटनेकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)