शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी बहुजन कल्याण मंत्रालयासाठी ३५ हजार कोटींचा निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:30 IST

गोंदिया : ओबीसी समाजाला मंडळ आयोगानुसार मिळालेल्या २७ टक्के आरक्षणानुसार अर्थसंकल्पात निधीची तरतूद होणे गरजेचे असताना फक्त तीन ...

गोंदिया : ओबीसी समाजाला मंडळ आयोगानुसार मिळालेल्या २७ टक्के आरक्षणानुसार अर्थसंकल्पात निधीची तरतूद होणे गरजेचे असताना फक्त तीन हजार कोटींची तरतूद करून फसवणूक करण्यात आली. याचा विरोध करीत ओबीसी संघर्ष समिती व ओबीसी सेवा संघाच्या वतीने ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद ओबीसींसाठी अर्थसंकल्पात करावी, अशी मागणी करीत उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ओबीसी कल्याणमंत्री, पालकमंत्री व विरोधी पक्षनेत्यांना निवेदन पाठविण्यात आले.

निवेदनात, ओबीसी बहुजन कल्याण मंत्रालय व या मंत्रालयांतर्गत येत असलेल्या महाज्योती या संस्थेची धुरा गैर ओबीसी व्हीजेएनटी अधिकाऱ्याकडे देऊन सरकार ओबीसींची फसवणूक करीत आहे. मागील पाच वर्षांपासून ओबीसी मंत्रालयाचे सचिव असलेले जे. पी. गुप्ता यांनी कुठलाही चांगला कार्यक्रम किंवा विकासात्मक धोरण ओबीसींकरिता तयार केलेला नसून त्यांच्यावर ओबीसींच्या योजना राबविण्यात अपयशी ठरल्याचा ठपका आहे. महाज्योती संस्थेच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदावर अजूनही पूर्णकालीन व्यवस्थापक न दिल्याने प्रभारी व्यवस्थापकामुळे या संस्थेतूनही ओबीसी, बहुजन व व्हीजेएनटी विद्यार्थ्यांच्या हिताच्या योजना राबविताना अडचणी निर्माण होत असल्याने या दोन्ही मुख्य पदावर ओबीसी व व्हीजेएनटी प्रवर्गातील पूर्णवेळ अधिकारी नेमून सरकारने ओबीसी मंत्रालयाला न्याय द्यावे, असेही नमूद आहे. शिष्टमंडळात अध्यक्ष बबलू कटरे, महासचिव मनोज मेंढे, शिशिर कटरे, कैलास भेलावे, खेमेंद्र कटरे, राजेश नागरीकर, सी. पी. बिसेन, सतीश मेश्राम, महेंद्र बिसेन, कमलनारायण कोरे, पप्पू पटले, मजहर शेख, गायधने, चौकलाल येळे, सरपंच उपराडे यांचा समावेश होता.

....

या आहेत प्रमुख मागण्या

ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, ओबीसी मुला-मुलींसाठी वसतिगृह व वाचनालय सुरू करावे, ओबीसी विद्यार्थ्यांकरिता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू करावी, ओबीसी संवर्गाचा सरकारी नोकरीतील अनुशेष भरण्याकरिता विशेष मोहीम राबविण्यात यावी व पदोन्नतीत आरक्षण द्यावे, ओबीसी, व्हिजे, एससी, एसबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीकरिता उत्पन्नाची अट एससी-एसटी संवर्गाप्रमाणे करावी, ओबीसी विद्यार्थ्यांना फ्री-शीपकरिता लावण्यात आलेली उत्पन्नाच्या मर्यादेची अट रद्द करण्यात यावी, शेतकरी व शेतमजुरांना पेन्शन योजना त्वरित लागू करावी, ओबीसी आर्थिक विकास महामंडळास लोकसंख्येच्या प्रमाणात निधी वळता करावा व या महामंडळावर स्थानिक ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींना प्रतिनिधित्व देण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश होता.