शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना तातडीने कर्जपुरवठा करा

By admin | Updated: June 1, 2016 02:25 IST

पावसाळ्याचे दिवस जवळ येत आहे. त्यामुळे शेतकरी मशागतीत गुंतला आहे. त्यांना विविध पिकांची लागवड करण्यासाठी बि-बियाणे,

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : बँक प्रतिनिधींची जिल्हास्तरीय आढावा सभागोंदिया :  पावसाळ्याचे दिवस जवळ येत आहे. त्यामुळे शेतकरी मशागतीत गुंतला आहे. त्यांना विविध पिकांची लागवड करण्यासाठी बि-बियाणे,रासायनिक खते व कीटकनाशके खरेदी करण्यासाठी जिल्हयातील सर्व बँकांनी शेतकरी खातेदारांना तातडीने खरीप पिक कर्जाचा पुरवठा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी आयोजित जिल्हास्तरीय बँक आढावा सभेत जिल्हाधिकारी बोलत होते. सभेला अग्रणी जिल्हा प्रबंधक अनिलकुमार श्रीवास्तव, जि.प.चे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, भारतीय रिझर्व बँकेच्या नागपूर कार्यालयाचे अग्रणी जिल्हा अधिकारी अनिल मेंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हयात २ लाख १२ हजार शेतकरी असल्याचे सांगून डॉ. सूर्यवंशी म्हणाले, ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत पिक कर्जाचा लाभ घेतला नाही, त्या शेतकऱ्यांना बँकांनी प्राधान्याने पीक कर्ज द्यावे. पिक विमा योजना आता सुलभ झाली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या विमा योजनेचा लाभ घ्यावा. रोजगार हमी योजनेवरील मजूर, रिक्षेवाले, पानटपरी, अस्वच्छ, व्यवसायात काम करणारे कामगार अशा असंघटीत स्वरूपातील कामगारांनी प्रधानमंत्री विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यास बँकांची उदासीनता दिसत असल्यामुळे शेतकरी कर्जासाठी सावकारांकडे धाव घेतात. भविष्यात पिक कर्जासाठी शेतकऱ्यांना सावकारांच्या दारात जाण्याची वेळ येवू नये यासाठी विविध बँकांच्या शाखांनी संबंधित गावातील शेतकऱ्यांना तातडीने कर्ज द्यावे. या सभेला जिल्हयातील सहकारी बँक, विदर्भ-कोकण ग्रामीण बँक व राष्ट्रीयकृत बँकांचे समन्वय अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)