शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

हृदयविकाराच्या झटक्यापासून रूग्णांचा बचाव करणार‘महाकॅप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST

ग्रामीण भागातील डॉक्टर रूग्णांसंबधी सर्व माहिती त्या ग्रुपवर टाकतात त्यावर विशेष तज्ज्ञ मोफत वेळीच मार्गदर्शन करतात. परिणामी रूग्णांना वाचविण्यात यश येते. महाकॅप म्हणजे महाराष्ट्र कॉर्डीओलॉजी जनजागृती कार्यक्रम असे म्हटले आहे. महाकॅप राज्यासह देशातील २० डीएम कॉर्डीओलॉजीस्ट सहभागी आहेत. ते सर्व सेवा करण्यासाठी सोबत जुळले आहेत.

ठळक मुद्देरूग्णांसाठी वरदान : व्हॉट्सअ‍ॅपवरून होताहे जनजागृती, दोनशे डॉक्टरांचा समूह करतोय मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जीवनशैलीतील बदलामुळे हृदयविकाराच्या रूग्णांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. हृदयविकाराच्या झटक्याने कोणत्याही रूग्णाला धोका होऊ नये, वेळेवर उपचार करण्यासाठी समाजसेवेचे ध्येय बाळगून सुवर्ण पदक प्राप्त कॉर्डीओलॉजीस्ट डॉ. प्रमेश गायधने यांनी महाकॅप नावाने व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप तयार करून त्यात अनेक तज्ज्ञांचा समावेश केला आहे.ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या डॉक्टराना मोफत मार्गदर्शन करून हृदयविकारावर मात करण्याचा त्यांचा माणस आहे.ग्रामीण भागातील डॉक्टर रूग्णांसंबधी सर्व माहिती त्या ग्रुपवर टाकतात त्यावर विशेष तज्ज्ञ मोफत वेळीच मार्गदर्शन करतात. परिणामी रूग्णांना वाचविण्यात यश येते. महाकॅप म्हणजे महाराष्ट्र कॉर्डीओलॉजी जनजागृती कार्यक्रम असे म्हटले आहे. महाकॅप राज्यासह देशातील २० डीएम कॉर्डीओलॉजीस्ट सहभागी आहेत. ते सर्व सेवा करण्यासाठी सोबत जुळले आहेत. कर्नाटकच्या बंगळुरु येथे सेवा देणारे डॉ. कामत हे सुध्दा मोफत सेवा देणार आहेत. या ग्रुपमधील डॉ. वैभव यावलकर, डॉ.आशिष बनपूरकर यांच्यासह दुसऱ्या राज्यातील विशेषतज्ज्ञ सहभागी झाले आहेत. गावातील डॉक्टरांना रूग्णांचा त्रास व ईसीजी रिपोर्ट पोस्ट केल्यास तज्ज्ञांच्या माध्यमातून तपासणी केली जाईल.तयार करण्यात आलेला हा ग्रुप सद्यास्थितीत फक्त गोंदियासाठी आहे. या ग्रुपमध्ये २०० डॉक्टर जुळलेले आहेत.भविष्यात ग्रुप अ‍ॅडमिनकडून प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत ईसीजी मशीन वाटप केली जाणार आहे.महाकॅप नावाचा ग्रुप गोल्ड होअर संकल्पनेवर आधारीत असल्याचे डॉ. गायधने म्हणाले. हृदयविकाराचा झटका येताच तासाभराच्या आत उपचार झाला तर ते उत्तम असते. त्याचा रूग्णालाही मोठा फायदा होतो.कर्नाटक येथे अशाच प्रकारच्या ग्रुपमुळे हजारो रूग्णांना फायदा झाला. वेळीच सल्ला व उपचार दिल्याने रूग्ण वाचू शकतो. रात्रीच्या वेळीच शहरातील रूग्णालयात पोहचविण्याच्या अगोदर त्यांना सल्ला मिळू शकतो. ग्रामीण भागातील डॉक्टरांना मोफत सल्ला देण्यासाठी हा ग्रुप तयार करण्यात आला आहे. महाकॅपमध्ये शासकीय व खासगी डॉक्टर सुध्दा सहभागी होऊ शकतात. हृदयविकारावर जनजागृती करण्यासाठी हा ग्रुप तयार करण्यात आला आहे. ह्या ग्रुपवर मिळणारी माहिती मोफत किंवा कोणत्याही खासगी रूग्णालयाशीसंबधी नाही,असे सांगण्यात आले.- डॉ.प्रमेश गायधनेहृदयरोग तज्ज्ञ

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटका