शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण करा

By admin | Updated: May 15, 2015 00:53 IST

उन्हाळ्यातील तापमानापासून दुधाळ तसेच इतर जनावरांचे आरोग्यपूर्ण संगोपन होण्यासाठी समतोल व परिपूर्ण आहार देणे आवश्यक आहे.

गोंदिया : उन्हाळ्यातील तापमानापासून दुधाळ तसेच इतर जनावरांचे आरोग्यपूर्ण संगोपन होण्यासाठी समतोल व परिपूर्ण आहार देणे आवश्यक आहे. दिवसातून दोन ते तीन वेळा पाणी शिंपडणे, भरपूर पाणी पाजणे, जीवनसत्व, कॅलरीज, क्षार यांचा समावेश असलेले खाद्य दिल्यानेच जनावरांचे योग्य संगोपन होऊ शकते. तीव्र उन्हापासून जनावरांचे संरक्षण व योग्य संगोपन पशुपालकांनी करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. उन्हाळ्यातील तापमान जनावरांना न मानवणारे असल्याने प्राथमिक स्तरावर दुधाळ जनावरांची काळजी घेताना जनावरांच्या गोठ्यात गोणपाट टाकून त्यावर पाणी शिंपडावे. दुधाळ जनावरांना दिवसातून दोन ते तीनवेळा थंड पाणी पाजावे. त्यामुळे तापमान संतुलीत राखण्यास मदत होईल. उन्हाळ्याच्या चार महिन्यांत हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने अशावेळी पूर्वतयारी म्हणून हिवाळ्यातच चाऱ्याचे नियोजन करावे. पशुखाद्यात साधारणपणे प्रथिनांचा समावेश करण्यासाठी हिरव्या चाऱ्याचे नियोजन करावे. शरीर वाढ, नवीन पेशी व स्नायुंच्या बळकटीसाठी हिरवा मका किंवा ज्वारीचे पेंड हिवाळ्यात साठवून ठेवावे. ते उन्हाळ्यात जनावरांना चारा म्हणून उपयोगात आणता येईल. उन्हाळ्यात शेतात हिरव्या चाऱ्याची लागवड करावी. त्यामुळे दुधाळ जनावरांना फायदा होऊ शकतो व पशुपालकांना दुधाचे अधिक उत्पन्न घेता येऊ शकते. त्यातून आर्थिक लाभ मिळवून घेता येईल.उन्हाळ्यात जाणवणारी चाऱ्याची टंचाई टाळण्यासाठी हिवाळ्यात भरपूर प्रमाणात चाऱ्याची साठवणूक करून ठेवावी, असा सल्ला जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने दिला आहे. (प्रतिनिधी)