शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

लाभार्थ्यांना योग्य सामाजिक न्याय

By admin | Updated: September 13, 2015 01:37 IST

सामाजिक न्याय विभागाच्या आणि या विभागाच्या अधिनस्थ असलेल्या विविध महामंडळामार्फत अनेक योजना राबविण्यात येतात.

राजकुमार बडोले : स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टरचे वाटपगोंदिया : सामाजिक न्याय विभागाच्या आणि या विभागाच्या अधिनस्थ असलेल्या विविध महामंडळामार्फत अनेक योजना राबविण्यात येतात. या योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात १० सप्टेंबर रोजी समाजकल्याण कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या सहा स्वयंसहायता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचे वाटप पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, आ.विजय रहांगडाले, प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जि.प.चे माजी कृषी समिती सभापती उमाकांत ढेंगे, महिंद्र ट्रॅक्टर्स कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक सचिन राजमाने यावेळी प्रमुख उपस्थित होते. डॉॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त १२५ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आल्याचे सांगून पालकमंत्री बडोले म्हणाले, नागपुर, पुणे आणि नाशिक येथे महिला कर्मचाऱ्यांसाठी निवासी वसतीगृह बांधण्यात येणार आहे. ज्या तालुक्यात वसतीगृह नाही तेथे विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह बांधण्यात येतील. ७९ प्रकारच्या विविध अभ्यासक्रमांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्याचा प्रयत्न असून इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह सुरू करण्याचा विचार असल्याचे बडोले यांनी सांगितले. जि.प.अध्यक्ष मेंढे म्हणाल्या, बचतगटाच्या माध्यमातून महिला सक्षम होताना दिसत आहे. बचत गटाच्या माध्यमातून जो व्यवसाय आपण सुरू करणार आहे तो व्यवसाय आपण चांगला व यशस्वीपणे करणार आहोत अशाच व्यवसायाची निवड बचतगटांनी करावी. घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळीच करावी. जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. आ. रहांगडाले म्हणाले, बचतगट हे सक्षमपणे चालले पाहिजे. मिनी ट्रॅक्टरच्या माध्यमातून महिला बचतगट हे सक्षम झाले पाहिजे. सामाजिक न्याय विभागाच्या योजना व विविध महामंडळाच्या योजनांचा लाभ जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी घ्यावा, असेही रहांगडाले म्हणाले. प्रभारी जिल्हाधिकारी मोहिते यांनी महिलांचे प्रश्न समजून घेणे आवश्यक असल्याचे सांगून त्यांना सक्षम करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्याची आवश्यकता विषद केली.पालकमंत्र्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले स्वयंसहायता महिला बचत गट रामपूर (माताटोली) ता.आमगाव, यशोधरा स्वयंसहायता महिला बचतगट तेढवा ता. गोंदिया, रमाबाई आंबेडकर महिला स्वयंसहायता बचत गट कुडवा ता. गोंदिया, सहयोग स्वयंसहायता महिल बचतगट गिधाडी ता.गोरेगाव, उपासना स्वयंसहायता महिला बचतगट चिचगावटोला, ता.गोरेगाव या सहा महिला बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनाचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक समाजकल्याणचे सहायक आयुक्त सुनील जाधव यांनी तर संचालन डी.आर.चव्हाण यांनी केले. यशस्वीतेसाठी वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक अंकेश केदार, संगणक आॅपरेटर लक्ष्मण खेडकर, वरिष्ठ लिपीक राजेश खरोले, पराते, जाधव, कळमकर, बावने यांनी परिश्रम घेतले. (जिल्हा प्रतिनिधी)योजनेत फेरबदल करणारपालकमंत्री बडोले म्हणाले, जास्तीत जास्त गरीब शेतकरी व बचतगटांच्या महिलांना सक्षम करण्यासाठी मिनी ट्रॅक्टर योजना महत्वाची आहे. या योजनेत फेरबदल करून जास्तीतजास्त निधीची यासाठी तरतूद करण्यात येईल. जास्तीत जास्त भूमिहिनांना जमीन देण्यासाठी दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेत बदल करण्यात येईल. त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेणे शक्य होईल. रिक्त पदांमुळे अडचणीमहामंडळातील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे योजना राबविताना अडचणी निर्माण होतात. महामंडळातील रिक्त पदे लवकर भरून ही महामंडळे सक्षम करण्यात येईल. त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांना महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ देता येईल. आश्रमशाळा व वसतिगृहांसाठी जमीन उपलब्ध झाल्यास त्वरित इमारती बांधण्यात येतील, असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.