शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या कमी दाबाची समस्या सुटणार

By admin | Updated: April 8, 2017 00:44 IST

सततच्या नापिकी व दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी विजेच्या कमी दाबाचा जबरदस्त शॉक लागला आहे.

एस.एम.वाकडे : शेतकऱ्यांना दिलासा शेंडा (कोयलारी) : सततच्या नापिकी व दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी विजेच्या कमी दाबाचा जबरदस्त शॉक लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उन्हाळी धान पीक बऱ्याच अंशी नष्ट झाले आहे. अशातच ९ एप्रिलपासून पूर्ववत विजेचा पुरवठा केला जाईल असे आश्वासन उपविभागीय अभियंता एस.एम. वाकडे यांनी शेतकऱ्यांना दिले आहे. कर्जाचा बोजा व दुष्काळाच्या हानीतून बाहेर पडण्यासाठी या परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानपिकाची लागवड करण्यात आली. मात्र धान निसव्यावर येताना विजेच्या कमी दाबाने मोटारी सुरुच होत नाही. त्यामुळे धान पीक नष्ट होत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी वारंवार वीज विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन धानपिकाची समस्या मांडली. यावर तांत्रीक अडचण समोर करुन हात वर करण्यात आले. याची दखल घेऊन जि.प. सदस्य सरिता कापगते, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा उषा शहारे, विलास कापगते, पुतळीचे उपसरपंच कापगते, हेमराज कापगते, शेंड्याचे उपसरपंच छत्रपाल परतेकी, ग्रा.पं.सदस्य पुस्तोडे व शेकडो शेतकऱ्यांनी आधी कनिष्ठ अभियंता टेंभुर्णीकर व नंतर उपविभागीय अभियंता वाकडे यांच्याशी या समस्येवर चर्चा केली. यावर ९ एप्रिल पासून पूर्ववत विजेचा पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन अभियंता वाकडे यांनी शेतकऱ्यांना दिल्याचे सांगण्यात आले. तर भ्रमणध्वनीवरुन संपर्क केला असता कनिष्ठ अभियंता टेंभुर्णीकर यांनी डोंगरगाव, सालेधारणी व खुर्शीॅपार ही गावे डुग्गीपार फिडरवर टाकले आहेत. तसेच देवरी विभागातील २० गावे ककोडी फिडरवर टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. शेंडा परिसरातील सर्वच गावांना विज पुरवठा पूर्ववत सुरु होईल असे सांगीतले.(वार्ताहर)