शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

समस्यांनी ग्रस्त दवनीवाडा अविकसितच

By admin | Updated: May 30, 2015 01:20 IST

इंग्रजांच्या राजवटीत जिल्ह्यातून सर्वात मोठे गाव दवनीवाडा होते. त्या काळात पोलीस ठाणे, जनपद काळातील शाळा व ग्रामपंचायत असूनही हे गाव आज अविकसितच आहे.

गोंदिया : इंग्रजांच्या राजवटीत जिल्ह्यातून सर्वात मोठे गाव दवनीवाडा होते. त्या काळात पोलीस ठाणे, जनपद काळातील शाळा व ग्रामपंचायत असूनही हे गाव आज अविकसितच आहे. कोणत्याही प्रकारे विकास झाला नसून त्याकडे राजकीय पदाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे अनेक समस्यांशी आजही हे गाव झुंझ देत आहे.मागील ३० वर्षांपासून दवनीवाडा जिल्हा परिषद क्षेत्र होते. परंतु जिल्हा परिषदेत ५२ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र वाढविण्यात आले. दवनीवाडा क्षेत्र तोडून नव्याने धापेवाडा जिल्हा परिषद क्षेत्र बनविण्यात आले. तर दवनीवाडाला रतनारा जिल्हा परिषद क्षेत्र नाव देण्यात आले. दवनीवाडा क्षेत्रातील वळद, खातीटोला, झाडुटोला हे गाव कमी करण्यात आले होते. परंतु दवनीवाडा येथील काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदारांसह जिल्हाधिकाऱ्यांना केवळ वळद गावाला दवनीवाडा क्षेत्रात समाविष्ट करण्याची मागणी केली. यात जिल्हाधिकाऱ्यांनी दवनीवाडा क्षेत्रात समाविष्ट गाव महालगाव, मुरदाडा, लोधीटोला, धापेवाडा, नवेगाव, देवरी मिळून धापेवाडाला वेगळे जिल्हा परिषद क्षेत्र केले. तर दवनीवाडा जुने क्षेत्र असून रतनारा या मोठ्या गावाला त्यात समाविष्ट करून रतनारा गावाला वेगळे जि.प. क्षेत्र बनविण्यात आले. येणाऱ्या जि.प. व पं.स. निवडणुकीत दवनीवाडा क्षेत्र बदलले. त्यामुळे सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. त्यात सांगण्यात आले की, दवनीवाडा क्षेत्र बदलून रतनारा नावाने दिलेल्या क्षेत्रात दवनीवाडा गावाकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे हे गाव विविध योजनांपासून वंचित राहणार काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणाचा बहिष्कार करू, असे भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले. मात्र तेच आता एकीकडे बहिष्कार तर दुसरीकडे जि.प. महिला राखीव उमेवारीसाठी गावोगावी फिरत आहेत. दवनीवाडा येथे राकाँ, काँग्रेसकडून जि.प. महिला उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांचे सोंग पुढे येत आहे.तिरोडा व गोंदिया या दोन्ही तालुक्यांच्या मध्यभागी दवनीवाडा गाव असून गोंदिया तालुक्यात मोडते. विधानसभा क्षेत्र तिरोडा असून संभावित नवनिर्माण दवनीवाडा तालुक्यात तिरोडा-गोंदिया तालुक्यातील एकूण ६५ गावांचा समावेश राहणार आहे. येथे २५ वर्षांपूर्वी तालुका निर्माण समिती गठित करण्यात आली. यात अध्यक्ष आसाराम कटरे, सचिव जे.बी. मंद्रेले, डॉ. ललन पांडे, मुन्नालाल चौधरी, विष्णू दोनोडे, शफी शेख, टेकचंद लिल्हारे, माधोराव भोयर आदींचा समावेश होता. सदर समितीमार्फत विधानसभेत दवनीवाडाला तालुका बनविण्याचा नियमित पाठपुरावा केला. मुख्यमंत्री, महसूलमंत्री, पालकमंत्री तसेच शासनाचे सचिव यांनी दवनीवाडाला तालुका बनविण्याच्या मागणीला सिफारस देवून सहमती दर्शविली. परंतु काही वर्षांपूर्वी समितीचे अध्यक्ष, सचिव व सहसचिव यांचा मृत्यू झाल्यानंतर नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली नाही. नवीन अध्यक्ष, सचिव व सदस्य केवळ कागदोपत्री मर्यादित आहेत. त्यामुळे सदर समितीच आता मृतावस्थेत दिसून येत आहे. त्यामुळे तालुका बनविण्याच्या मागणीलाच विराम लागल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)