शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शांती व सलोख्यासह विधायक कार्याला प्राधान्य

By admin | Updated: September 11, 2015 02:10 IST

गावकऱ्यांनी एकमेकाबद्दलची हाडवैराची भूमिका स्वीकारू नये. लहान-मोठ्या कारणांवरून होणाऱ्या भांडणाला वाव न देता सृजनशीलता ...

बोंडगावदेवी : गावकऱ्यांनी एकमेकाबद्दलची हाडवैराची भूमिका स्वीकारू नये. लहान-मोठ्या कारणांवरून होणाऱ्या भांडणाला वाव न देता सृजनशीलता अंगिकारून गावातील वाद गावातच मिटविण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीकडे धाव घेऊन सामोपचाराने तंट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जाईल. गावात शांती व सलोखा निर्मिती करण्याबरोबरच गावातील समस्या मार्गी लावण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणार, अशी ग्वाही तंमुसचे अध्यक्ष तुळशीदास बोरकर यांनी दिली. येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड झाल्यानंतर ग्रामपंचायतच्या सभागृहात झालेल्या पहिल्या बैठकीत पदग्रहण केल्यानंतर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तुुळशीदास बोरकर होते. याप्रसंगी समितीचे जेष्ठ पदाधिकारी सरपंच राधेश्याम झोळे, उपसरपंच वैशाली मानकर, निमंत्रक पोलीस पाटील मंगला रामटेके, माजी अध्यक्ष डॉ. शामकांत नेवारे, मु.धो. मानकर, भिवाजी शहारे, कुकसू मेश्राम, शेवंता मानकर, ग्रामसेवक एल.एम. ब्राम्हणकर, पतीराम मेश्राम उपस्थित होते. बोरकर पुढे म्हणाले, गावातील तंटे गावाबाहेर न जाता गावामध्ये सामोपचाराने निराकरण करून गावात शांतता कायम राहण्यासाठी सदस्यांनी सहकार्य करावे. न्यायनिवाडा प्रक्रियेत सहभागी होण्यास प्रथम प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. येत्या काही दिवसांत येणाऱ्या पोळा, गणपती उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, भाऊबंदकी व एकोप्याने उत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. काही असामाजिक तत्त्वांवर पायबंद घालण्यासाठी सामाजिक सुरक्षा दलाची नेमणूक करण्यासाठी युवकांनी पुढे यावे. गावात शांतता तसेच सलोखा वातावरण निर्मिती तंमुस प्रयत्न करेल, अशी ग्वाही देऊन संबंधिताना निवेदन देऊन समस्या मार्गी लावण्याला प्राधान्य देण्यात येईल. येथील आरोग्य केंद्रात, जि.प. आयुर्वेदिक दवाखान्यात गेल्या कित्येक महिन्यांपासून डॉक्टर नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. डॉक्टरांच्या पूर्ततेसाठी तंमुसच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले जाईल, असे बोरकर यांनी सांगितले. बैठकीला तंमुसचे अमरचंद ठवरे, संतोष टेंभुणेर, साधू मेश्राम, कृष्णा खंडाईत, अनिरूध्द रामटेके, द्वारका भैसारे, विजया मानकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)वजने झाली गायबतिरोडा : प्रत्येक आठवडी बाजारातून आता वजने गायब झाली आहेत. त्याऐवजी चक्क दगड, आलू, कांदे आदी जिन्नसांचा वापर वजन म्हणून केला जात आहे. यामुळे ग्राहकांची आर्थिक लुबाडणूक होत आहे.