शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
3
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
4
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
6
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
7
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
8
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
9
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
10
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
11
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
12
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
13
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
14
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
15
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
16
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
17
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
18
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
19
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
20
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षकांचे मार्चपासूनचे वेतन अडले

By admin | Updated: May 23, 2014 23:58 IST

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे मार्च महिन्यापासूनचे वेतन अजूनही मिळाले नाही. त्यामुळे शिक्षक वर्ग आर्थिक कोंडीत सापडला आहे. पाल्यांचे शिक्षण, लग्नसराई व इतर कार्यक्रमांची रेलचेल असताना वेतन

गोंदिया : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे मार्च महिन्यापासूनचे वेतन अजूनही मिळाले नाही. त्यामुळे शिक्षक वर्ग आर्थिक कोंडीत सापडला आहे. पाल्यांचे शिक्षण, लग्नसराई व इतर कार्यक्रमांची रेलचेल असताना वेतन न मिळाल्याने जिल्ह्यातील शिक्षकांत शिक्षण विभागाविरूद्ध असंतोष व चिड निर्माण झाली आहे. मार्च व एप्रिल महिन्याचे वेतन व इतर मागण्यांच्या निराकरणासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गोंदियाच्या वतीने विरेंद्र कटरे, एस.यू. वंजारी, डी.टी. कावळे यांच्या नेतृत्वात ९ मे रोजी जि.प. चे उपाध्यक्ष तथा शिक्षक समितीचे सभापती मदत पटले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षणाधिकारी पाटील व कनिष्ट शिक्षण अधिकारी शिरसाटे यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली होती. यात वेतनाच्या मुद्यांवर संघटनेच्या वतीने तीव्र पवित्रा घेण्यात आले असता दोन दिवसांत वेतनाची रक्कम पंचायत समितीला पाठवू, असे शिक्षणाधिकारी यांनी सांगितले. मार्चचे वेतन जुन्याच पद्धतीने व एप्रिलचे वेतन शालार्थ योजनेनुसार मिळेल, असेही सांगितले होते. परंतु आज चर्चेला १५ दिवस लोटले तरी शिक्षकांना वेतन मिळाले नाही. यावरुन शिक्षण विभागाचा भोंगळ व सुस्त कारभाराच्या विरोधात उन्हाळा असला तरी घेराव व आंदोलनाचा पवित्रा घेतल्याशिवाय संघटनेकडे पर्याय उरला नाही. दुसरीकडे शासनाची शालार्थ वेतन योजना कितीही चांगली असली तरी ही योजना जिल्ह्यात राबविताना प्रशासनाने शिक्षकांना सांगताना भारी डोकेदुखी बनवून दिली आहे. शिक्षकांना वेतनासाठी पैसे मोजावे लागत आहेत. मुख्याध्यापकांनी मार्च व एप्रिलचे वेतन इंटरनेटवर लोड करुन गटशिक्षणाधिकार्‍यांना पाठविले. प्रत्येक शाळेत संगणक व इंटरनेट सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली नाही. परंतु वेतन इंटरनेटवर लोड कुठूनही करा-पण करा, अशी सूचना गटशिक्षणाधिकार्‍यांकडून मिळाल्यामुळे मुख्याध्यापकांना संगणक कॅफे व जाणकार व्यक्तीकडे जाऊन वेतनबिल डाऊनलोड करावे लागले. यासाठी शिक्षकांना प्रति शिक्षक ५० रुपये तर कुठे १०० रुपये तर कुठे १५० रुपये खर्च करावे लागले. वेतन एक तारखेला पाहिजेत तर वेतन बिल इंटरनेटवर डाऊनलोड करा, असे सांगितल्यानंतर मार्च व एप्रिलचे वेतन मात्र कोसो दूर आहे. त्यासाठी शाळावार वेतन बिल इंटरनेटवर डाऊनलोड करण्याची सुविधा प्रशासनाने पंचायत समिती स्तरावर करावी. वेतनासाठी लागणारा खर्च बंद करावा. अन्यथा वेतनावर बहिष्कार करुन कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गोंदियाच्या वतीने घेतला जाईल. असा इशारा प्रसिद्धीपत्रकातून विरेंद्र कटरे, आनंद पुंजे, एस.यू. वंजारी, डी.टी. कावळे, हेमंत पटले, उमाशंकर पारधी, सुधीर बाजपेयी, नागसेन भालेकर, यशोधरा सोनवाने, नानन बिसेन, रेणुका जोशी आदी महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा गोंदियाच्या पदाधिकार्‍यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)