रस्त्यावरील पाणी काही प्रमाणात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आत शिरले. परिसरात पाणी साचल्याने आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांचे हाल होत होते. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर गाळे असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळेच पाण्याचा निचरा होण्यासाठी आतून मोठ्या नालीला जोडणारी लहान नाली बांधणे गरजेचे आहे. दरवर्षी या परिसरात पाणी साचत असल्याने वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. मागील कित्येक वर्षांपासून पडलेल्या अवस्थेत असलेल्या खोल्यात पाणी साचून असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांचेच आरोग्य धोक्यात आले आहे. जुनी वसाहत ही बांधकाम विभागाकडे असल्याने आरोग्य विभागाने त्याबाबत बांधकाम विभागाला सूचना केली. पण त्यांनी अद्यापही गांभीर्याने घेतले नाही.
............
आरोग्य कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात कर्मचारी वसाहतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. तर जीर्ण झालेल्या इमारतींमध्ये पाणी साचून राहत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचेच आरोग्य धोक्यात आले आहे.
..............
दखल घेणार काेण?
प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी छोट्या नाल्या अद्यापही तयार करण्यात आल्या नार्त. त्यामुळे थोडाही पाऊस झाला की केंद्राच्या परिसरात गुडघाभर पाणी साचते. परिणामी येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांनासुध्दा त्रास सहन करावा लागत आहे.