शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीतील धानाला कवडीमोल भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:29 IST

रावणवाडी : रब्बी हंगामातील धानाची विक्री करण्यासाठी अद्याप परिसरात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे शेतकरी ...

रावणवाडी : रब्बी हंगामातील धानाची विक्री करण्यासाठी अद्याप परिसरात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना धान विकत असून, व्यापारी कवडीमोल भाव देऊन त्यांची अक्षरश: आर्थिक लूट करीत आहेत.

सिंचनाच्या सोयी असलेल्या शेतकऱ्यांनी खरिपाला पर्याय म्हणून रब्बी हंगामात धानपिकाची लागवड केली. या धानाची काही दिवसांपूर्वी कापणी झाली असून बहुतेक शेतकऱ्यांनी मळणीसुद्धा केली आहे. परंतु अजूनही शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू होण्याचा मार्ग दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आर्थिक अडचण लक्षात घेऊन खासगी व्यापाऱ्यांना धान विकणे सुरू केले आहे. व्यापारी शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेऊन प्रति क्विंटल १४०० रुपये भाव देऊन शेतकऱ्यांची अक्षरश: आर्थिक लूट करीत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, शेतकऱ्यांना या रकमेतून कर्जाची परतफेड अन्‌ दैनंदिन खर्च करणे कठीण झाले आहे. दरम्यान, खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी आर्थिक लूट थांबविण्यासाठी शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कोट

खरिपातील विकलेल्या धानाची रक्कम वेळेत मिळाली नाही. त्यामुळे बँकेचे कर्ज निर्धारित वेळेत भरता आले नाही. परिणामी, अधिक व्याज द्यावे लागणार आहे. याचाही फटका बसणार आहे.

प्रभु लिल्हारे, शेतकरी रावणवाडी

शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रे अद्याप सुरू झाली नाहीत. त्यामुळे आम्हाला खासगी व्यापाऱ्यांना धान विकावे लागत आहे. हे व्यापारी अल्प भाव देऊन आर्थिक लूट करीत आहेत. त्यामुळे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रे लवकर सुरू होणे गरजेचे आहे.

सोहिद कोहारे, मुरपार