शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांची किंमत ठरतेय वजनावर

By admin | Updated: May 31, 2015 00:47 IST

काही वर्षापूर्वी जनावरांची किमत ही दुधावर आणि त्यांच्या जातीवरुन ठरत होती.

कत्तलीसाठी विक्री : शेकडो जनावरे बाजारातून कत्तलखान्याकडे; दलालांची कमाईगोंदिया : काही वर्षापूर्वी जनावरांची किमत ही दुधावर आणि त्यांच्या जातीवरुन ठरत होती. पण सध्या तीच किंमत आता जनावरांच्या वजनावरून ठरत असल्याने पालनाऐवजी कत्तलीसाठी जनावरांची खरेदी होत असल्याचे चित्र दिसून येते.एखाद्या गाईला वासरु झाल्यानंतर त्याच दिवशी त्या गावातील एखादा दलाल येऊन वासरू देणारा का, असा प्रश्न शेतकऱ्याला विचारतो. शेतकरीही या निरुपयोगी प्राण्यास दररोज किमान दोन लिटर दूध घालण्याऐवजी देऊन टाकतो. याचे कारण म्हणजे किमान दोन महिने याला दूध घातल्यास पाच हजार रुपयांचे नुकसान होणार, शिवाय वैरण व इतर खर्च वेगळा. असा विचार करुन तो ते लहान वासरु दलालाला देतो. तो दलाल अशी चार-पाच वासरे जमा करुन कसायाला विकतो. असे या कसायाचे गावोगावी जाळे पसरले आहे.सध्या जनावरांच्या मांसाला चांगली किंमत व मुबलक मागणी असल्याने भाकड जनावरांसह दुधाळ आणि गाभण जनावरे कत्तलखान्याकडे जात आहेत. यावरुन मोठ्या शहरात किती जनावरे लागत असतील, याची कल्पना न करणे बरे. दर आठवड्याला प्रत्येक बाजारातून शेकडो जनावरे कत्तलखान्याकडे जात आहेत. बाजारात जास्तीत जास्त धष्ठपुष्ठ असणाऱ्या जनावरांवर या व्यापाऱ्यांचा डोळा असतो. मग ते जनावर गाभण असले तरी कापण्यासाठी नेले जाते. एखाद्या जनावराची किमत तिचे दूध पाहता १५ हजार असेल तर तेच जनावर कत्तलखान्यासाठी तीन हजार रुपयांत खरेदी केले जाते. त्यात जनावरांचे मांस, हाडे, चरबी, चमडे याची किंमत एकत्रित केली असता त्याची किंमत ६० हजार होते. म्हणजे जनावराची किंमत चौपट होते. एक जनावर कमीत कमी चाळीस किलो ते सहाशे किलोपर्यंत वजनाचे असते. त्यामुळे किमत दीड लाखांपर्यंत जाते. एखाद्या चांगल्या जनावरांची किंमत देऊन ते घेण्यासाठी शेतकरी असमर्थ आहे. तर एकीकडे जनावराला अधिक किमत येत असल्याने आनंदाने विकणारा शेतकरीच आहे.त्यामुळे जनावरांची संख्या रोडावत चालली आहे. शासनाने कत्तलखान्यांवर निर्बंध घालणे आवश्यक आहे. गाभण, दुध देणारे जनावर कापण्यावर दंड आकारणे गरजेचे आहे. तर कत्तलखाने चालविणाऱ्यांनी उपयोगी जनावरे न घेता केवळ भाकड व निरुपयोगी अशी जनावरे खरेदी करावीत. अशी सक्त ताकीद या दलालांना देण्यात यावी. (तालुका प्रतिनिधी)