शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास आळा घालण्यासाठी ‘सुपर आर्मी’

By admin | Updated: August 31, 2014 23:58 IST

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर बंदी घालण्यासाठी शासनाने कितीही प्रयत्न केले तरी ते प्रयत्न १०० टक्के यशस्वी ठरत नाही. अशा पदार्थांची लपूनछपून विक्री सुरूच असते. याशिवाय या पदार्थांच्या गेल्यावर

विजेंद्र मेश्राम - खातियातंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर बंदी घालण्यासाठी शासनाने कितीही प्रयत्न केले तरी ते प्रयत्न १०० टक्के यशस्वी ठरत नाही. अशा पदार्थांची लपूनछपून विक्री सुरूच असते. याशिवाय या पदार्थांच्या गेल्यावर त्यांचे सेवन एकदम बंद करणे शक्य नसते. कोणतेही परिसर असो तंबाखूजन्य पदार्थ खाणारे आढळतातच. ही बाब लक्षात घेवून अशा पदार्थांच्या सेवनावर आळा घालण्यासाठी खातिया येथील कुवर तिलकसिंह जि.प. माध्यमिक शाळेत ‘सुपर आर्मी’ स्थापित करण्यात आली. रावणवाडी केंद्रांतर्गत येणाऱ्या या शालेय परिसरात किंवा शाळेच्या अवतीभोवती कुणीही तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करताना आढळले तर शाळेची ही सुपर आर्मी त्या व्यक्तीचे पाय पकडून ते पदार्थ मागतील व कचऱ्याच्या कुंडीत जमा करतील. शालेय परिसरात खर्रा, बीडी, सिगारेट आदी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करताना कुणी आढळले तर सुपर आर्मीचे सदस्य त्या व्यक्तीचा घेराव करतील. त्यानंतर त्याचे पाय पकडून त्या तंबाखूजन्य पदार्थाची मागणी करतील. जोपर्यंत तो इसम आपल्या पँट किंवा शर्टच्या खिशातून ते पदार्थ देणार नाही तोपर्यंत सुपर आर्मीचे सदस्य त्याचे पाय सोडणार नाही. शाळेच्या वतीने सुपर आर्मीचे गठन करण्यात आले असून गावातील लोकांना वाईट सवयींपासून मुक्त करणे व कर्करोगासह होणाऱ्या इतर रोगांपासून त्यांना वाचविणे, हाच उद्देश्य यामागे आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर आळा घालण्यासाठी गावात जनजागृती घडवून आणण्यासाठी ही सुपर आर्मी प्रयत्न करणार आहे. या सुपर आर्मी समितीच्या वर एक तंबाखू निर्मूलन समिती आहे. यात मुख्याध्यापक के.एच. रहांगडाले व शिक्षक एस.आर. ब्राह्मणकर आणि सदस्यांमध्ये सरपंच व पालक आहेत. तसेच सुपर आर्मीच्या चमूमध्ये दहा विद्यार्थी व दहा विद्यार्थिनींचा समावेश आहे.