शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

गरोदर महिलांनाही घेता येणार कोरोना प्रतिबंधक लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 05:00 IST

लसीकरणापासून कुणीची सुटू नये यासाठी आता १८-४४ वयोगटाला परवानगी देण्यात आली असून लहान मुलांसाठीही वेगवेळ्या लसींच्या चाचण्या सुरू आहेत. त्यात प्रश्न होता तो फक्त गरोदर महिलांचा कारण, लसीचा प्रभाव दोन जीवांवर पडणार असल्याने गरोदर महिलांना लस देण्यावर संसोधन सुरू होते. या संशोधनात कोरोनाची लस गरोदर महिलांसाठीही सुरक्षित असल्याचे निष्पन्न  झाले असून गरोदर महिलांनाही आता लस घेता येत आहे.

ठळक मुद्देलस सर्वांसाठी सुरक्षित : मात्र गरोदर महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावाच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या कहराची परिस्थिती कानी पडताच आजही अंगावर काटे उभे राहतात. यामुळे आता पुढे कोरोनाची लाट आपल्या देशात येऊच द्यायची नसेल तर जास्तीत जास्त लसीकरण करावे अशा सूचना शास्त्रज्ञांनीही दिल्या आहेत. त्यानुसार, देशात लसीकरणाची मोहीम आता एक चळवळ म्हणून राबविली जात आहे. यामुळेच लसीकरणापासून कुणीची सुटू नये यासाठी आता १८-४४ वयोगटाला परवानगी देण्यात आली असून लहान मुलांसाठीही वेगवेळ्या लसींच्या चाचण्या सुरू आहेत. त्यात प्रश्न होता तो फक्त गरोदर महिलांचा कारण, लसीचा प्रभाव दोन जीवांवर पडणार असल्याने गरोदर महिलांना लस देण्यावर संसोधन सुरू होते. या संशोधनात कोरोनाची लस गरोदर महिलांसाठीही सुरक्षित असल्याचे निष्पन्न  झाले असून गरोदर महिलांनाही आता लस घेता येत आहे. मात्र लस घेणे त्यांची ऐच्छीक बाब असून लस घेतल्यानंतर कित्येकांना ताप, अंगदुखी, मळमळ सारखे त्रास जाणवतात. अशात गरोदर महिलांना असे त्रास जाणवल्यास त्यांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणेच गरजेचे असल्याचे स्त्रीरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.  

गरोदर महिलांनी घ्यावयाची काळजी

गरोदर महिलांचा स्त्रीरोगतज्ज्ञांकडे उपचार सुरूच असतो. अशात लस घेण्याबाबत त्यांनी आपल्या डॉक्टरांशी सल्ला घ्यावा. कोरोनाची लस घेणे गरोदर महिलांसाठीही ऐच्छिक आहे. मात्र कोरोनाची लस ही ‘लाईफ सेव्हिंग’ लस असल्याने कोरोनापासून बचावासाठी प्रत्येकाने ती घेणे गरजेचे आहे. शिवाय, गरोदर महिलांसाठीही ती सुरक्षित असल्यानेच शासनाने गरोदर महिलांसाठीही लस घेण्यास परवानगी दिली आहे. मात्र तरीही गरोदर महिलेला लस घ्यावयाची असल्यास सर्वप्रथम याबाबत आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चालणे कधीही सुरक्षित आहे. शिवाय लस घेतल्यानंतर त्रास झाल्यास आपल्या मर्जीने कोणतेही औषध न घेता थेट डॉक्टरांशी सल्ला घ्यावा. कारण, हा दोन जीवांचा प्रश्न आहे. 

गरोदर महिलांनी लस घेणे ही त्यांची ऐच्छिक बाब आहे. मात्र लस घेणे गरजेचे आहे. लस घेतल्यानंतर ताप, अंगदुखी, मळमळ यासारखे त्रास कित्येकांना जाणवत आहेत. गरोदर महिलांनाही हे त्रास जाणवल्यास घाबरण्याची गरज नाही. मात्र १-२ दिवसांपेक्षा जास्त दिवस हे त्रास असल्यास लगेच आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. - डॉ. प्रणिता चिटणवीस, स्त्रीरोगतज्ज्ञ, गोंदिया. 

कोरोनापासूनच बचावासाठी प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे. मात्र गरोदर महिलांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. लस घेतल्यानंतर काही त्रास असल्यास महिलांनी फक्त पॅरासिटामॉल घ्यावी. जास्तच त्रास असल्यास अन्य कुणाच्याही सांगण्यावरून कोणतेही औषध घेऊ नये. थेट आपल्या डॉक्टरांशीच संपर्क साधावा. - डॉ. मेघा रत्नपारखी, स्त्रीरोगतज्ज्ञ, गोंदिय

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस