युवा वर्गाचा सहभाग : कवी व साहित्यिकांची हजेरीबाराभाटी : परिवर्तनशील साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात शनिवारी दुपारी कवी संमेलन साजरे झाले. त्यावेळी अध्यक्ष हरिश्चंद्र लाडे, डॉ. नूरजहा पठान, प्रा. मिलिंद रंगारी व अनिल मेश्राम यांच्या उपस्थितीत राज्याभरातील कवींनी हजेरी लावली. यामध्ये जास्तीत जास्त युवा कवींचा सहभाग होता. यावेळी नागपूरचे प्रा. प्रवीण कावळे, प्रकाश कावळे, जगदिश राऊत, सुरेश वंजारी, शीला आठवले, प्रा. मंगेश जनबंधू, डॉ. गुलाब मुळे, एकनाथ बुध्दे, सिध्दार्थ वालदे, रोशन पिल्लेवान, संजय सायरे, दिगांबर चनकापुरे, पुरूषोत्तम डोंगरे, सुरेश करणासे, करूणा मून, अस्मिता मेश्राम, अहल्या रंगारी, पांडुरंग नंदागवळी, नामदेश कानेकर, मनोज बोरकर, प्रकाश गायकवाड, शैलेंद्र बोरकर, नंदकुमार खोब्रागडे, सरिता रामटेके, के.ए. रंगारी असे अनेक कवी उपस्थित होते. त्यांनी प्रेम, शेतकऱ्यांच्या व्यथा, माय-आई आणि चळवळीच्या संदर्भात चारोळी, कविता सादर केल्या. मिळाली राजगादी तुम्हाला नाही बहुजनांचा राजा, माय-बाप आपला झालाहा बाबासाहेब समजा... जीव भाटतया...तिथेच ओवावा धागाग,बाई दुखाच्या कष्टाने लिपाव्या भेगा ग...त्याचप्रमाणे मुलांसाठी पाळणासुध्दा गायला. अशा विविध विषयांच्या कविता ऐकवून पिंपळगाववासीयांना मंत्रमुग्ध केले. कविसंमेलनाचे संचालन प्रा. रेवाराम खोब्रागडे यांनी केले. आभार मुन्नाभाई नंदागवळी यांनी मानले. कविसंमेलनामध्ये प्रबोधन करणाऱ्या कविता, व्यथा दु:ख, वेदना, आई तर मनमोहक बेधुंद असणारे प्रेम या विषयांवर कवितांच्या सादरीकरणाने काव्य गुलमोहर बहरला.-हरिश्चंद्र लाडे, कवी, पालांदूर (भंडारा)मी शिक्षण घेताना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडल्या जाण्याचे कारण असे की, माझा अभ्यास, चळवळीच्या खाणा-खुणा, मी सहन केलेल्या वेदना व्यथा, आमच्या समाजातील सामान्य जनतेचे दु:ख, वेदना आणि चळवळीची स्थिती याची मुख्य कारणे आहेत. सामाजिक नीतिमूल्ये रुजवताना मी साहित्यातून, विचारातून व्यक्त करून आम्ही परिवर्तन नक्कीच घडवून आणणार. हे काम फक्त तरूणच करू शकतात. जागा हो, तरूणा जागा हो.प्रा. वैशाली रामटेके, साहित्यिक, संमेलनाध्यक्ष.
प्रबोधनाला साहित्याचा जोर, फुलला काव्याचा गुलमोहर
By admin | Updated: February 9, 2016 01:35 IST