शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वीज चोरीला महावितरणचेच पाठबळ

By admin | Updated: September 6, 2014 23:51 IST

गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेश मंडळांकडून केल्या जात असलेल्या रोषणाईसाठी आणि झगमगाटासाठी चक्क चोरीची वीज वापरली जात असल्याचे चार दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने सचित्र वृत्तांत देऊन

एकही कारवाई नाही : ८०० हून अधिक मंडळाकडे अवैध जोडणीगोंदिया : गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेश मंडळांकडून केल्या जात असलेल्या रोषणाईसाठी आणि झगमगाटासाठी चक्क चोरीची वीज वापरली जात असल्याचे चार दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने सचित्र वृत्तांत देऊन उघडकीस आणले होते. परंतू त्यानंतरही महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाग आलेली नाही. गणेशोत्सवाचे आठ दिवस लोटले तरी एकाही मंडळावर महावितरणने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे हा अधिकाऱ्यांचा घाबरटपणा आहे की, वीज चोरीसाठी दिलेली उघड सूट आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.एरवी एखाद्या घरगुती ग्राहकाने अधिकृत मिटरमध्ये थोडी गडबड केली तर त्याला हजारो रुपयांचा दंड ठोठावणारे महावितरणचे अधिकारी कोणतेही मीटर न घेता थेट तारांवर आकडे टाकून वीजप्रवाह घेणाऱ्या मंडळांवर एक रुपयाही दंड ठोठवायला तयार नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.जिल्ह्यात एकूण ८४७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यापैकी गोंदिया शहरातील फक्त १६ आणि इतर २० ते २५ मंडळांनी मिळून जेमतेम ४० च्या जवळपास मंडळांनी गणेशोत्सवाच्या काळासाठी अधिकृतपणे तात्पुरत्या वीज जोडणीसाठी महावितरणकडे अर्ज करून वीज पुरवठा घेतला आहे. या मंडळांना कंपनीकडून मीटरही पुरविण्यात आले आहे. परंतू ८०० पेक्षा जास्त गणेशोत्सव मंडळांनी अनधिकृतपणे थेट किंवा काही छोट्या मंडळांनी घरगुती मीटरवरून वीज पुरवठा घेतल्याचे दिसून येते. गोंदिया शहरात अनेक मोठ्या मंडळांकडून केल्या जाणाऱ्या विद्युत रोषणाईसाठी सर्रास आकडे टाकून वीज पुरवठा घेतला जात आहे. याबाबतची चार दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने कशा पद्धतीने आकडे टाकून वीज चोरी केली जात आहे याची सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतरही महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाग आलेली नाही. किमान नावापुुरत्या तरी काही मंडळांवर कारवाई करून महावितरणचे अधिकारी आपली लाज राखतील अशी अपेक्षा इमाने इतबारे मीटर लावून वीज घेणाऱ्या इतर मंडळांना होती. परंतू महावितरण जर कोणतीच कारवाई करणार नसेल तर आम्हीही पुढील वर्षी अधिकृतपणे वीज जोडणी घेण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा अधिच आकडे टाकून वीज घेऊ, अशी भावना काही मंडळांच्या सदस्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. (जिल्हा प्रतिनिधी)