शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

डाक विभागाने उत्तरतालिकांसह उमेदवारांचे गुण प्रसिद्ध करावे

By admin | Updated: September 16, 2015 02:29 IST

महाराष्ट्र पोस्टल सर्कल मुंबईच्या वतीने जाहिरात प्रसिद्ध करून पोस्टमन-मेलगार्ड व एमटीएस (मल्टी टास्कींग स्टॉफ) पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात आली.

उमेदवारांची मागणी : उत्तरपत्रिकांची कार्बनकॉपी न मिळाल्याने संभ्रमाची स्थितीगोंदिया : महाराष्ट्र पोस्टल सर्कल मुंबईच्या वतीने जाहिरात प्रसिद्ध करून पोस्टमन-मेलगार्ड व एमटीएस (मल्टी टास्कींग स्टॉफ) पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. सध्या या पदांच्या उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आल्या. मात्र पोस्टमन पदांसाठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना उत्तरपत्रिकांची कार्बनकॉपी देण्यात न आल्याने त्यांना आपल्याला किती गुण मिळाले, हे समजू शकत नाही. त्यामुळे प्रश्नसंचनिहाय उत्तरतालिका व उमेदवारांना मिळालेले गुण प्रसिद्ध करण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे.प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्र पोस्टल सर्कल मुंबई विभागामार्फत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. नागपूर पोस्टल विभागासाठी नागपूर येथील विविध शाळांत परीक्षा केंद्रे देऊन परीक्षा घेण्यात आली. परंतु परीक्षा कक्षातील काही पर्यवेक्षकांच्या अपुऱ्या माहितीमुळे काही उमेदवारांना उत्तरपत्रिकांची कार्बनकॉपी देण्यात आली नाही. यात २९ मार्च २०१५ रोजी पोस्टमन व ३ मे २०१५ रोजी एमटीएस पदांसाठी परीक्षा घेण्यात आल्या. परीक्षेतील रोलनंबर, पद व भाषा आदी माहिती संबंधित वेबसाईवर घालताच परीक्षेतील प्रश्नांची योग्य उत्तरे कोणती, याची माहिती मिळते. तसेच उत्तराबाबत आक्षेप नोंदवायचे असल्यास ते नोंदविण्याची संधीसुद्धा नेटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.मात्र पोस्टमन पदासाठी ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली, त्यांना त्यांच्या काही परीक्षा केंद्रांवरून उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी देण्यात आली नाही. या प्रकारामुळे आपण नेमके कोणती उत्तरे नमूद केली, हेच कळणे काही उमेदवारांना अशक्य आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिकांच्या संचानिहाय उत्तरतालिका व उमेदवारांना मिळालेले गुण इंटरनेटवर संबंधित वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे. (प्रतिनिधी)