आमगाव : तालुक्यातील ग्राम शिवणी येथील वादग्रस्त सरपंच राजेश मटाले यांनी मनमर्जीने गावातील आबादी प्लाटची विक्री केली. ज्याला सदर आबादी प्लाट विक्री केली, ज्याला सदर आबादी प्लाट देण्यात आले त्याचे रेकॉर्डवरुन नाव कमी करण्यात आले. कर आकारणी रजिस्टरमध्ये खोडतोड करण्यात आले. यासंदर्भात २४ फेब्रुवारीला उपसरपंच अरुण राऊत व काही सदस्यांनी लेखी तक्रार केली. मात्र चौकशी करुन सरपंचावर कारवाई झाली नाही. त्यामुळे कारवाई तत्काळ करण्याची मागणी उपसरपंच राऊत यांनी केली आहे. ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता सरपंच मटाले व टेकराज हेमणे यांनी आबादी प्लॉटची विक्री केली. ज्याला प्लॉट विकण्यात आला तो शिवणी येथील रहिवासी नाही. मात्र त्यांनी सरपंचाला १५ हजार रुपये दिल्याचे गावकर्यांना सांगितले. सदर प्लॉट शिवणी येथील पुरुषोत्तम इसन बावणे यांच्या नावाने देण्यात आले होते. त्यावर कर आकारणी करण्यात आली होती. त्या करआकारणी नोंद पुस्तकात खोडतोड करण्यात आली व नंतर प्रकरण अंगावर येत आहे समजून तेथे व्हाईटनर लावण्यात आले हे स्पष्ट नोंदणी पुस्तकात दिसत आहे. या आबादी प्लॉटच्या विक्रीसंदर्भात सविस्तर चौकशी करून सरपंच मटाले व हेमणे यांच्यावर त्वरित कारवाईची मागणी उपसरपंच राऊत व काही ग्रामपंचायत सदस्यांनी लेखी तक्रार करुन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
आबादी प्लाट विक्री प्रकरण
By admin | Updated: May 11, 2014 23:52 IST