शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी उधळल्या चार दारू भट्ट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:30 IST

तिरोडा : अवैध दारू विक्रेत्यांविरोधात पोलीस कंबर कसून आहे व अवैध दारू विक्रेत्यांच्या वारंवार मुसक्या आवळत आहे. असे असतानाही ...

तिरोडा : अवैध दारू विक्रेत्यांविरोधात पोलीस कंबर कसून आहे व अवैध दारू विक्रेत्यांच्या वारंवार मुसक्या आवळत आहे. असे असतानाही अवैध दारू विक्रेत्यांकडून दारू विक्री काही बंद केली जात नसल्याने पोलिसांचे धाडसत्र सुरूच आहे. अशातच पोलिसांनी ग्राम रामाटोला (सिल्ली) येथे एका घरावर धाड घातली असून तेथून चार लाख सहा हजार ४०० रूपयांचाी माल जप्त केला आहे.

ग्राम रामाटोला-सिल्ली येथे संजय सोविंदा बरेकर हा हातभट्‌टीने दारू गाळून विक्रीचा व्यवसाय करतो या माहितीवरून पोलिसांनी त्याच्या घरावर धाड घातली. यात त्यांना घरात ४ रनिंग भट्‌ट्या आढळल्या. तसेच त्याच्या घराच्या मागील बाजूस २३० प्लास्टिक पोतडीत प्रती पोतडी २० किलोप्रमाणे ४६०० किलो मोहा सडवा मोहवा ज्याची किंमत तीन लाख ६८ हजार रूपये आहे मिळून आला. तर डबकीत प्रत्येकी १० लीटरप्रमाणे २०० लीटर हातभट्टीची दारू, ४ लाकडी टवरे, ४ जर्मन घमेले, ४ लोखंडी ड्रम, ४ नेवार पट्‌टी, प्लास्टिक पाइप, ४ लोखंडी ड्रममध्ये ४० किलो गरम मोहा सडवा मोहवा, १२० किलो जळावू काड्या असा एकूण चार लाख सहा हजार ४०० रूपयांचा माल मिळून आला. तसेच आरोपी रनिंग भट्‌टी लावून मोहफुलांची दारू गाळताना मिळून आला.

सध्या कोविड-१९ ची साथ असल्याने आरोपीला अटक न करता कलम ४१(१)(अ) सीआरपीसी अन्वये नोटीस देण्यात आले आहे. पोलिस शिपाई विदेश अंबुले यांच्या तक्रारीवरून आरोपी संजय बरेकर याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नायक बांते करीत आहेत. ही कारवाई सपोनि ईश्वर हनवते, सपोनि अभिजीत जोगदंड, पोउपनि अशोक केंद्रे, पोलिस शिपाई विदेश अंबुले व पथकाने केली.