शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदी केंद्रावर लूट

By admin | Updated: May 22, 2015 01:56 IST

एकीकडे आधीच धानाला भाव नसल्याने शेतकरी त्रस्त असताना आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट सुरू आहे.

अर्जुनी मोरगाव : एकीकडे आधीच धानाला भाव नसल्याने शेतकरी त्रस्त असताना आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. उन्हाळी धानपिक विक्रीसाठी जिल्हा मार्केटिंग कार्यालयाने ठरवून दिलेल्या धान खरेदी केंद्रावरच शेतकऱ्यांना धान विक्रीचे पहिल्यांदाच बंधन घालण्यात आले असल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.प्राप्त माहितीनुसार तालुक्यात खरेदी विक्री समिती, विजय कापगते यांचे राईस मिल, लक्ष्मी सहकारी धान गिरणी, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, नवेगावबांध, महागाव, वडेगाव व धाबेटेकडी या आठ ठिकाणी आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू आहेत. धान खरेदी केंद्रांना इलेक्ट्रानिक वजनकाटे पुरविण्यात आले. मागील खरीप हंगाम धानखरेदीपर्यंत या वजनकाट्यांचा वापर करण्यात आला. मात्र सध्या सुरू असलेल्या धान खरेदीसाठी साध्या वजनकाट्यावरच मोजमाप केलेले परवडते. इलेक्ट्रानिक्स वजनकाट्यावर अधिकचे धान लुटण्याची सुविधा नसते. यासाठी चार्र्जींगची समस्या सांगून धान खरेदी करणाऱ्या संस्था हेतू पुरस्सर इलेक्ट्रानिक्स वजनकाट्याचा वापर टाळतात. अर्जुनी मोरगाव येथील धान खरेदी केंद्रावर मार्केटिंग अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या डोळ्यादेखत ४० किलो ऐवजी ४१ किलो वजन ठेवून मोजमाप केले जात आहे. याशिवाय बारदानाच्या मोबदल्यात बारदानाऐवजी पोते मांडून वजनकाटा केला जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. बारदान्याचे वजन ६०० ग्रॅम असते तर पोत्याचे वजन एक किलोवर असते. यात सुद्धा ४०० ग्रॅमपेक्षाही अधिक वजन दर ४० किलोमागे घेतले जाते, अशी ओरड आहे. या व्यतिरिक्त वजन करत असताना झुकते माप घेतले जात असल्याची तक्रार आहे. दररोज संध्याकाळी धान खरेदी बंद झाल्यानंतर प्रत्येक पोत्यांचे वास्तविक वजना करुन उर्वरित धान काढले जातात. हा अतिरिक्त लाभ असल्याचे समजते. दैनंदिन या प्रक्रियेत संस्थांना मोठा आर्थिक लाभ होत असल्याच्या चर्चा आहेत.धान विक्रीसाठी तालुक्यातील सर्वच गावांची आठ धान खरेदी केंद्रात समावेश असलेली गावनिहाय यादी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाकडून तयार करण्यात आली आहे. यापूर्वी कोणत्याही गावच्या शेतकऱ्याला आपल्या सोईनुसार नजीकच्या धान खरेदी केंद्रावर धान विक्रीची मुभा होती. मात्र आता ठराविक केंद्रावरच विक्री करावयाची असल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे. दर एकरी १० क्विंटल धान खरेदी केंद्रामार्फत सातबाराच्या उताऱ्यावर घेतले जातात. परंतु १५ ते २० क्विंटल प्रमाणे धान खरेदी केले पाहिजे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कामाच्या मोबदल्यात मजूरवर्ग हा शेतकऱ्यांकडून धान घेत नाही. त्ळााल रोखट मजुरी द्यावी लागते. तरी सुद्धा शासन दर एकरी १० क्विंटलच शेतकऱ्यांकडून धान खरेदी करतो. त्यामुळे अधिकच्या उत्पादित धानाला व्यापाऱ्यांकडे कवडीमोल भावात विक्री करावे लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)