शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बोचऱ्या थंडीच्या आगमनाने शिशिर ऋतूचा आनंददायी स्पर्श

By admin | Updated: January 24, 2016 01:45 IST

१५ जानेवारीला सूर्याचा उत्तरायण होण्याचा पर्व साजरा करण्यात आला आणि तीन-चार दिवस ढगाळ वातावरणानंतर अचानक वातावरणात बदल झाला ...

शेकोट्या वाढल्या : ऊनी कापडांची खरेदी वाढलीविजय मानकर सालेकसा१५ जानेवारीला सूर्याचा उत्तरायण होण्याचा पर्व साजरा करण्यात आला आणि तीन-चार दिवस ढगाळ वातावरणानंतर अचानक वातावरणात बदल झाला आणि बोचरी थंडीचे आगमन झाले. यंदा जास्त थंडी वाटत नाही असे लोक म्हणत असतानाच शिषिर ऋतूचे वारे वाहू लागले व पौष महिन्याची बोचरी थंडी अंगाला स्पर्श करू लागली आहे. या स्पर्शाने ग्रामीण भागात घरोघरी लोक शेकोटी पेटवून तिच्याभोवती आपला वेळ काढत आहेत तर सायंकाळ होताच रस्त्यावर अघोषित संचारबंदी झाल्यासारखे दृश्य दिसू लागले आहेत. रस्त्यावरून जाने आवश्यक झाले तर लोक जॅकेट, स्वेटर, मफलर, टोप, शाल, मौजे इत्यादी उष्ण लोकरीचे कपडे वापरत बाहेर पडत आहेत. वात विकारांच्या लोकांसाठी ही बोचरी थंडी मोठी वेदनादेणारी व धोक्याची ठरत असते तर काहींना आनंदी वाटत आहे.भारतीय उपखंडात हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा हे तिन्ही ऋतू पूर्व प्रभावाने येणे आणि जाणे हा क्रम वर्षभर चालत असतो. या भूभागावर वरील तिन्ही ऋतू व्यतिरीक्त इतर अल्पकालीक ऋतू सुध्दा येत असतात आणि त्याच्या सुध्दा प्रभाव मानवी जीवनावर पडत असतो. यात शरद, शिषिर, वसंत सारख्या ऋतुंचा समावेश असतो. हे छोटे व अल्पकालीन ऋतूत पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा यांच्या मधात येऊन दुसऱ्या ऋतूच्या आगमनाची चाहूल देण्याचे संकेत देतात. जगातील प्रत्येक देशातील हवामान वेगवेगळा असतो. परंतु प्रत्येक देशातील हवामानासारख्या हवामान भारतीय उपखंडात वेग वेगळ्या ठिकाणी अनुभवला जातो. म्हणून भारताला विविधतेचा देश मानला जातो. त्यामुळे विश्वातील प्रत्येक देशाच्या पर्यटकांना आकर्षित करणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. याला अनेक कारणे आहेत त्यात भारताला लाभलेला विस्तारीत भूभाग उत्तरेकडे विशाल पर्वत रांगा, पूर्वेकडील वन क्षेत्र तसेच दक्षिणेकडील महासागर आणि पश्चिमेकडील वाळवंट हे भारताला मोठे वरदान लाभलेले आहे. या सगळ्यावर पृथ्वीला सूर्याची दक्षिणायन आणि उत्तरायन ही खगोलीय घटना महत्वाची ठरत असते. पृथ्वी सूर्याच्या गुरूत्वाकर्षणात राहून स्वत: फिरत असतानाच वर्षातून एक फेरी सूर्याभोवती फिरत असते. त्यामुळे २४ तासात दिवस रात्र आणि वर्षभरात वेग वेगळे ऋतू घडवून येतात. अक्षांशचा विचार केल्यास शून्य अंशावरील विषुववृत्तापासून उत्तरकडे साडे तेवीस अंशावरून कर्कवृत्त गेलेले आहे. ते भारताच्या मधोमध पूर्व-पश्चिम असे गेलेले आहे. त्यामुळे भारतात विशेष करून मध्य भारताच्या क्षेत्रात समशीतोष्ण हवामान असतो. भारतीय उपखंडात २३ मार्च आणि २३ सप्टेंबरचा दिवस रात्र समकालावधीचा असतो. २३ मार्चनंतर दिनमान मोठा आणि रात्र छोटी होण्याला सुरूवात होऊन २१ जूनला सर्वात मोठा दिवस असतो. जवळपास १४ तासाचा असून रात्र १० तासाची असते. २३ सप्टेंबरपासून दिवसाच्या कमी होण्याला प्रारंभ होऊन २२ डिसेंबर रोजी सर्वात छोटा दिवस असून १० तासाचा दिन व १४ तासाची रात्र असते. यावेळी पृथ्वी दक्षिणी कक्षेत सूर्य असून त्यानंतर गोलार्ध बदलते. १४ किंवा १५ जानेवारीला सूर्य उत्तरायनाच्या प्रक्रियेत येऊन मकर राशीत प्रवेश करतो. यानंतर हळूहळू सूर्याची उष्णता दक्षिणेत साडेतेवीस अंशावरील असलेल्या मकर वृत्तावरून कमी होते. उत्तरेकडील कर्कवृत्ताकडे वाढत जाते. याच कालावधीत पश्चिमी वारे वाहू लागतात याचा प्रभाव भारतीय खंडात पडतो आणि पानझडीला सुरूवात होते. यात झाडाची पाने गळून खाली पडतात. त्यानंतर वसंत ऋतुमध्ये नवीन पानाफुलांची झाडे पुन्हा बहरू लागतात. या पानझडीच्या शिशीर ऋतुचा वारा मनाला आनंदी करणारा परंतु शरीराला बोचणारी असल्याने यापासून वाटणारी थंडी ही बोचरी थंडी मानली जाते. हा काळ शीत प्रकृतीच्या लोकांना त्रासदायक असतो तर उष्ण प्रकृतीच्या लोकांना मोठा आनंददायी असतो तरी एकंदरीत हा काळा मनाला प्रफुल्लीत करणारा मानला जातो. काही तज्ञ लोकांच्या मतानुसार हा काळ प्रेमीयुगुलांना एकमेकाशी भेटण्यासाठी मनात तीव्रता निर्माण करणारा सुध्दा मानला जातो.