शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

सह महिन्यांनंतर प्लॅटफाॅर्म तिकीट दर पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:35 IST

गोंदिया : रेल्वे विभागाने तब्बल सहा महिन्यांच्या कालावधीनंतर प्लॅटफाॅर्म तिकीटदर ५० रुपयांवरून पूर्ववत दहा रुपये केले आहे. याची अंमलबजावणी ...

गोंदिया : रेल्वे विभागाने तब्बल सहा महिन्यांच्या कालावधीनंतर प्लॅटफाॅर्म तिकीटदर ५० रुपयांवरून पूर्ववत दहा रुपये केले आहे. याची अंमलबजावणी बुधवारपासून (दि. १५) करण्यात आली. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनाचा संसर्ग लक्षात घेत रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने प्लॅटफाॅर्म तिकीट दर १० रुपयांवरुन ५० रुपये केले होते. त्यामुळे रेल्वे स्थानकावर नातेवाईक व मित्र परिवाराला सोडणे चांगलेच महागडे झाले होते. मागील सहा महिन्यांपासून प्लॅटफाॅर्म तिकीट दर ५० रुपये होता. मागील दोन तीन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येऊन आणि रेल्वे प्रवासी वाहतूक सेवा पूर्ववत सुरु होऊनसुद्धा रेल्वे विभागाने प्लॅटफाॅर्म तिकीट दर पूर्ववत केले नव्हते. त्यामुळे नागरिकांनी यावर आक्षेप घेत रोष व्यक्त केला होता. काही रेल्वे स्थानकावर प्लॅटफाॅर्म तिकीट दर दोन महिन्यापूर्वीच पूर्ववत करण्यात आले होते. पण गोंदिया रेल्वे स्थानकावर प्लॅटफाॅर्म तिकिटासाठी ५० रुपये आकारले जात होते. यासंदर्भात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे गोंदिया स्टेशन सल्लागार समितीने नागपूर विभाग मंडळ व्यवस्थापक मनिंदसिंह उप्पल यांना निवेदन देऊन प्लॅटफाॅर्म तिकीट दर पूर्ववत करण्याची मागणी केली होती. त्याचीच दखल रेल्वे विभागाने बुधवारपासून प्लॅटफाॅर्म तिकीट दर पूर्ववत १० रुपये केले आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

..............

एमएसटी पूर्ववत सुरु करा

मागील दीड वर्षांपासून रेल्वेने कोरोनामुळे मंथली सिजन पास (एमएसटी) बंद केले आहे. यामुळे दररोज अपडाऊन करणाऱ्यांना प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. गोंदिया ते नागपूर आणि गोंदिया-बल्लारशा या मार्गावर दररोज अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांची संख्या चार ते पाच हजार आहे. एमएसटी बंद असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे एसएसटी पूर्ववत सुरु करण्याची मागणी गोंदिया स्टेशन सल्लागार समितीने केली आहे.

..............

दररोज २०० प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री

हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे प्रमुख रेल्वे स्थानक आहे. सद्यस्थितीत या रेल्वे स्थानकावरुन ४७ रेल्वेगाड्या धावत असून ५ ते ७ हजार प्रवासी करीत आहे. या रेल्वे स्थानकावरून दररोज २०० प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री होते. मागील सहा महिन्यांत प्लॅटफाॅर्म तिकिटाचा दर ५० रुपये केल्याने रेल्वे विभागाला चांगला महसूल प्राप्त झाला.