शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वन महोत्सवात १४ लाख रोपट्यांची लागवड

By admin | Updated: July 13, 2016 02:27 IST

शासनाने १ जुलै रोजी राज्यभरात दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यात गोंदिया जिल्ह्याला १० लाख...

वन विभागाची उद्दिष्टपूर्ती : वृक्षारोपणासाठी खोदले १० लाख ५४ हजार ६१६ खड्डे गोंदिया : शासनाने १ जुलै रोजी राज्यभरात दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यात गोंदिया जिल्ह्याला १० लाख ५४ हजार ६१६ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्ह्यात त्या उद्दीष्टापेक्षा जास्त रोपट्यांची लागवड झाली. यासोबतच १ ते ७ जुलैदरम्यान साजऱ्या झालेल्या वनमहोत्सवादरम्यान विविध ठिकाणी वृक्ष लागवडीत भर पडून ही संख्या १४ लाखांच्या घरात पोहोचल्याची माहिती उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी दिली. पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्याच्या उद्देशाने शासनाने राज्यभर वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला. यात जिल्ह्यातील सर्वच यंत्रणांनी सहभाग घेतला. वन विभाग गोंदियाला सात लाख ४८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. वन विभागाने आपल्या ७४ साईट्समध्ये सात लाख ४८ हजार रोपट्यांची लागवड करून सदर उद्दिष्टाची पूर्तता केली. वन विभागाशी निगडीत इतर विभागांनाही वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यात सामाजिक वनीकरण विभागाला २९ हजार, वन विकास महामंडळाला ३१ हजार ८००, नवेगाव-नागझिरा वन्यजीव विभागाला १९ हजार ४६६ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट मिळाले होते. या विभागांनी तेवढ्याच रोपट्यांची लागवड करून आपली उद्दिष्टपूर्ती केली. याशिवाय जिल्हाभरातील इतर २० यंत्रणांना दोन लाख २६ हजार ३५० वृक्षांच्या लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र दोन लाख २३ हजार ५३६ रोपट्यांचीच लागवड त्यांनी केली. सदर २० यंत्रणांकडून तब्बल दोन हजार ८१६ रोपट्यांची लागवड करण्यात आली नाही. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण १० लाख ५१ हजार ८०२ रोपट्यांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणाचे कार्य तर आटोपले. परंतु आता प्रमुख समस्या म्हणजे त्यांचे संरक्षण व संवर्धनाची आहे. ही जबाबदारी वन व्यवस्थापन समित्यांना देण्यात आली आहे. त्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांमध्ये शासनाच्या वतीने आणखी जागृती आणणे गरजेचे आहे. अन्यथा लागवड केलेल्या रोपट्यांपैकी किती जिवंत राहतील व किती नष्ट होतील, भविष्यात हा एक शोधाचा विषय ठरणार आहे. (प्रतिनिधी)