शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभेत वृक्ष लागवड आराखड्याचे नियोजन

By admin | Updated: June 26, 2016 01:39 IST

ग्रामपंचायत सावरी येथे विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेला जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार आवर्जुन उपस्थित होते.

सीईओंची उपस्थिती : शाळेकरिता दिले १० हजार ५०० वृक्षगोंदिया : ग्रामपंचायत सावरी येथे विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेला जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार आवर्जुन उपस्थित होते. यावेळी वृक्ष लागवडीच्या कृतिबद्ध आराखड्याचे नियोजन करण्यात आले.याप्रसंगी पुलकुंडवार यांनी ग्रामसभेचे महत्त्व पटवून दिले. मानवाला प्राणवायूची गरज असते, तो वृक्षांपासून मिळतो. सन २०१९ पर्यंत आपल्याला ५० कोटी वृक्ष लावायचे आहेत. मराठवाड्यात पाणी नाही म्हणून मुलगी देत नाही. अशी वेळ गोंदियावासीयांवर येवू नये, असे त्यांची सांगितले. आपल्या मार्गदर्शनात पं.स. चे विस्तार अधिकारी रवींद्र पराते म्हणाले, झुडपी जंगले असून त्या ठिकाणी झाडे नाहीत. त्यामुळे पाणी जिरत नाही. त्यासाठी झाडे लावणे गरजेचे असल्याचे सांगितले. तर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी, एक विद्यार्थी एक झाड लावावे. शाळेकरिता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १० हजार ५०० झाडे दिल्याचे सांगितले. ग्रामसभेला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पुलकुंडवार यांच्यासह गटविकास अधिकारी एस.के. वालकर, सहायक गटविकास अधिकारी नरेंद्र भांडारकर, सरपंच डुलेश्वरी पटले, उपसरपंच नरेंद्र चिखलोंडे, सदस्य प्रेमचंद बिसेन, पप्पू पटले, माजी सदस्य गजभिये आदी उपस्थित होते. या ग्रामसभेला जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी उपस्थित लावल्यामुळे गावकऱ्यांनी त्यांच्याकडे काही व्यथाही मांडल्या. सभेचे संचालन के.एस. शेंदूरकर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. ५० टक्के महिला आरक्षणाचा आधार घेवून महिलांना बोलण्याची संधी दिली. त्यामुळे आम्हाला बोलायची संधी मिळाली नाही, असे सांगून काही पुरूषांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. (जिल्हा प्रतिनिधी)