गोंदिया : २८ मार्चपासून येत असलेल्या सलग सुट्यांमुळे शासकीय कर्मचाऱ्यांची लॉटरी लागली आहे. ५ एप्रिलपर्यंत हा सुट्यांचा वर्षाव होणार असून या कालावधीत फक्त दीडच दिवस बँक खुल्या राहतील. त्यातही मार्च एडींगचा समावेश असून त्यामुळे बँक कर्मचारीच काय अन्य शासकीय कर्मचाऱ्यांचीही यातून चांदी झाली आहे. त्यामुळे शासकीय कर्मचारी आतापासूनच आपल्या सुट्यांचे प्लान करीत असल्याचे दिसून येत आहे.येत्या २८ मार्च पासून सलग धार्मिक सण व उत्सव येत आहेत. त्यामुळे त्या दिवसांची सुटी सवर्च शासकीय कर्मचाऱ्यांना आहे. त्यात मात्र बँकांचे इयर एंडींग येत असल्याने ३१ मार्च व १ एप्रिल रोजी बँकांचा व्यवहार बंदच राहणार आहे. त्यानंतर ४ एप्रिलचा शनिवार सोडून ५ एप्रिलपर्यंत सुट्याच सुट्या आहेत. एकंदर २८ मार्च ५ एप्रिल या कालावधीत फक्त ३० मार्च रोजी बँक व अन्य शासकीय कार्यालय सुरू राहतील. तर ४ एप्रिल रोजी शनिवार असल्याने सर्वांचा अर्धा दिवस कारभार सुरू राहणार आहे. उर्वरीत दिवस मात्र पूर्ण सुट्टीचे आहेत. (शहर प्रतिनिधी)असा आहे सुट्यांचा वर्षावदिनांक निमित्त२८ मार्च रामनवमी२९ मार्च रविवार३१ मार्च बँक क्लोजिंग१ एप्रिल क्लोजिंग हॉलीडे२ एप्रिल महावीर जयंती३ एप्रिल गुड फ्रायडे४ एप्रिल हाफ डे५ एप्रिल रविवार
प्लान करा आपली सुट्टी
By admin | Updated: March 16, 2015 00:02 IST