शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

गाळ काढण्याचे योग्य नियोजन करा

By admin | Updated: May 18, 2017 00:16 IST

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना जिल्ह्यातील शेतक ऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

राजकुमार बडोले : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा आढावा लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना जिल्ह्यातील शेतक ऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. आपला जिल्हा हा तलावांचा आहे. प्रत्येक गावाच्या आजुबाजूला २ ते ४ तलाव आहे. अनेक वर्षापासून हे तलाव गाळाने भरले आहे. हा गाळ सुपीक असून खत म्हणून या गाळाची उपयुक्तता मोठी आहे. शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी गाळ उपयुक्त ठरणार असल्यामुळे गाळ काढण्याचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले. सोमवारी (दि.१५) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेचा आढावा घेतांना ते बोलत होते. सभेला आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पथाडे, उपजिल्हाधिकारी आर.टी.शिंदे, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. पालकमंत्री बडोले म्हणाले, या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १०० हेक्टरच्या आतील सर्व माजी मालगुजारी तलावातील गाळ नियोजनातून काढून शेतकऱ्यांच्या शेतात टाकावा. मुरु म मिश्रीत गाळ रस्त्याच्या बाजूला टाकावा. या योजनेतून तलावाची पाणी साठवण क्षमता वाढली पाहिजे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत तर होईल. सोबत रब्बीच्या सिंचनासाठी पाण्याचा वापर करता येईल. ३१ मे पर्यंत गाळ काढण्याचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावा. पाण्याची साठवण क्षमता वाढविण्यासोबत शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी ही योजना मोठी संजीवनी देणारी आहे. प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी ५० तलावातून गाळ काढण्याचे नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावाच्या दुरु स्तीचा कार्यक्र म यापूर्वी हाती घेण्यात आला असल्याचे सांगून नामदार बडोले पुढे म्हणाले, तलावांच्या कालव्यांच्या बळकटीकरणाचा कार्यक्र म हाती घेण्यात यावा, त्यामुळे शेतकऱ्यांना योग्यप्रकारे पाण्याची उपलब्धता होण्यास मदत होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी काळे म्हणाले, या योजनेअंतर्गत यंत्रणांनी जास्तीत जास्त गाळ काढून त्या गाळाचे महत्व शेतकरऱ्यांना पटवून देवून तो गाळ जास्तीत जास्त शेतकरी शेतात टाकतील यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे. हा गाळ शेतात टाकल्यामुळे पुढील वर्षीपासून शेतीची उत्पादकता निश्चित वाढलेली असेल. जवळपास जिल्ह्यातील १८०० तलावातील गाळ काढण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील १०० हेक्टरच्या आतील तलावातील गाळ काढण्याचे नियोजन करण्यात आल्याचे कार्यकारी अभियंता पथाडे यांनी सांगितले. सभेला सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.